PV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन म्हणाले..
PV Sindhu Wins Bronze Medal: बॅडमिंटनपटू सिंधूने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने या सामन्यात चीनच्या खेळाडूला पराभूत करून ही कामगिरी केली.
PV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीत कांस्य पदक जिंकून चीनची खेळाडू हि बिंग जिआओला सरळ गेममध्ये पराभूत करून इतिहास रचला. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व राखत देशासाठी पदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करून तिच्या खेळाचे कौतुक केले आहे.
राष्ट्रपती म्हणाले, "सिंधूने भारताचा गौरव केला"
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट केले, की "पीव्ही सिंधू दोन ऑलिम्पिक गेम्समध्ये पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेचा एक नवीन मापदंड प्रस्थापित केला. भारताला अभिमान मिळवून दिल्याबद्दल मी तिचे हार्दिक अभिनंदन करतो."
P V Sindhu becomes the first Indian woman to win medals in two Olympic games. She has set a new yardstick of consistency, dedication and excellence. My heartiest congratulations to her for bringing glory to India.
— President of India (@rashtrapatibhvn) August 1, 2021
पंतप्रधान मोदी म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले, "पीव्ही सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आम्ही सर्व उत्साहित आहोत. टोकियो 2020 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. ती भारताची शान आहे आणि आमची सर्वात उत्कृष्ट ऑलिम्पियन आहे. #टोकियो 2020."
We are all elated by the stellar performance by @Pvsindhu1. Congratulations to her on winning the Bronze at @Tokyo2020. She is India’s pride and one of our most outstanding Olympians. #Tokyo2020 pic.twitter.com/O8Ay3JWT7q
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2021
गृहमंत्री अमित शाह यांनीही केलं अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट केले, की "पीव्ही सिंधू खूप छान खेळली. तुम्ही खेळाप्रती तुमची अतुलनीय बांधिलकी आणि समर्पण वारंवार सिद्ध केले आहे. तुम्ही राष्ट्राचा गौरव करत राहा. आम्हाला तुमच्या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान आहे."
Well played @Pvsindhu1.
— Amit Shah (@AmitShah) August 1, 2021
Time and again you have proved your unparalleled commitment and devotion towards the game. May you continue to bring glory to the nation.
We are proud of your remarkable accomplishment. pic.twitter.com/uiGNLwwMVO
असा होता सामन्याचा थरार
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा येथे 53 मिनिटे चाललेल्या सामन्यात चीनची खेळाडू बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. सिंधूला उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या ताइ जू यिंगकडून 18-21, 12-21 असे पराभूत व्हावे लागले होते. मात्र, त्याने कांस्यपदकासह आपला ऑलिम्पिक प्रवास पूर्ण केला आहे.