एक्स्प्लोर

Wrestler Ravi Kumar Enters Final : कुस्तीत रवि दहिया अंतिम फेरीत, भारताचं आणखी एक पदक निश्चित, कझाकिस्तानच्या पैलवानाला लोळवलं

Wrestler Ravi Kumar enters final : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आज चांगलं यश मिळालं आहे. बॉक्सिंगमध्ये लवलीनानं कांस्यपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीत रवि दहियानं अंतिम फेरी गाठली आहे.

Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आज चांगलं यश मिळालं आहे. बॉक्सिंगमध्ये लवलीनानं कांस्यपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीत रवि दहियानं अंतिम फेरी गाठली आहे. रविच्या या विजयानं भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. कझाकिस्तानच्या पैलवानाला सेमीफायनलमध्ये नमवत त्यानं अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरी रविनं विजय मिळवला तर भारताला सुवर्णपदक मिळेल, जर तो तिथं पराभूत झाला तरी रौप्यपदक निश्चित झालं आहे. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दीपक पुनियाच्या कामगिरीकडेही लक्ष लागून आहे. 

Tokyo Olympics 2020: कुस्तीत भारताचा दबदबा, दीपक पुनिया, रवि दहिया सेमीफायनलमध्ये, अंशु मलिकचा मात्र पराभव

प्री  क्वार्टर फायनलमध्ये रवि दहिया विरुद्ध कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानो यांच्यातील पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं शानदार विजय मिळवला होता. प्री क्वार्टर फायनल सामन्यात  त्यानं  कोलंबियाच्या कुस्तीपटूला  13-2 असा पराभव केला. क्वार्टर फायनलमध्ये त्यानं बलगेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 असं पराभूत करत पुढची फेरी गाठली होती. 

Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर, आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत

तर पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो गटात प्री क्वार्टर सामन्यात दीपक पुनियानं नायजेरियाच्या एकरेकेम एगियोमोरला 13-1 असं हरवत क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या कुस्तीपटूशी झालेल्या सामन्यात दीपकनं रोमांचक विजय मिळवला. त्यानं चीनच्या खेळाडूचा 6-3 असा पराभव केला. शेवटच्या दहा सेकंदात 3-3 अशी बरोबरी असताना दीपकनं तीन प्वाईंट घेत 6-3 अशी आघाडी घेत शानदार विजय मिळवला. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 

Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक

नीरज चोप्राची जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी

ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे.  क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget