एक्स्प्लोर

Tokyo Olympics 2020: कुस्तीत भारताचा दबदबा, दीपक पुनिया, रवि दहिया सेमीफायनलमध्ये, अंशु मलिकचा मात्र पराभव

Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं आज आशादायक सुरुवात केली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा फायनलमध्ये गेल्यानंतर कुस्तीत देखील भारताच्या कुस्तीपटूंनी शानदार यश मिळवलं आहे.

Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं आज आशादायक सुरुवात केली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा फायनलमध्ये गेल्यानंतर कुस्तीत देखील भारताच्या कुस्तीपटूंनी शानदार यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची कुस्तीपटू अंशू मलिकला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. 

Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर, आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत

रवि दहिया विरुद्ध कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानो यांच्यातील पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं शानदार विजय मिळवला. रवि दहियानं हा सामना जिंकत प्री क्वार्टर फायनल सामन्यात बाजी मारली आहे. रविनं हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानं  कोलंबियाच्या कुस्तीपटूला  13-2 असा पराभव केला. रविकुमारनं या गटात सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायललमध्ये त्यानं बलगेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 असं पराभूत करत पुढची फेरी गाठली. सेमिफायनलमध्ये तो पाकिस्तानच्या खेळाडूशी लढणार आहे. 

Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक

तर पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो गटात प्री क्वार्टर सामन्यात दीपक पुनियानं नायजेरियाच्या एकरेकेम एगियोमोरला 13-1 असं हरवत क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या कुस्तीपटूशी झालेल्या सामन्यात दीपकनं रोमांचक विजय मिळवला. त्यानं चीनच्या खेळाडूचा 6-3 असा पराभव केला. शेवटच्या दहा सेकंदात 3-3 अशी बरोबरी असताना दीपकनं तीन प्वाईंट घेत 6-3 अशी आघाडी घेत शानदार विजय मिळवला. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 

नीरज चोप्राची जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी

ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे.  क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget