(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tokyo Olympic 2020: बॉक्सिंगमध्ये भारताला एकापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा; मेरी कोमवर सर्वांची नजर
Tokyo Olympic 2020: भारतातर्फे बॉक्सिंगमध्ये 9 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. बॉक्सिंगमध्ये भारताला एकापेक्षा जास्त पदक जिंकण्याची आशा आहे.
Tokyo Olympic 2020: पुढील महिन्यात 23 जुलैपासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होत आहेत. भारताच्या पाच पुरुष आणि चार महिला बॉक्सर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्या आहेत. बॉक्सिंगमध्ये भारत जास्तीत जास्त पदके जिंकेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत भारतात बॉक्सिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. त्यामागील एक कारण म्हणजे ऑलिम्पिक खेळांमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला मिळालेली पदकं. 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये विजेंदरसिंगने भारताकडून कांस्यपदक जिंकले होते. यानंतर एमसी मेरी कोमने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.
यावेळी अनेक बॉक्सर या खेळांमध्ये सहभागी होत असून एकापेक्षा जास्त पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. भारतीय संघाचे हाय परफॉरमन्स डायरेक्टर सॅटियागो निवा म्हणाले की, गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केल्यामुळे आणि त्यांच्या क्षमतेवर आत्मविश्वास असल्याने बॉक्सर्सवर अपेक्षेंचं ओझं राहणार नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्येही सर्वांची नजर जागतिक विजेती मेरी कॉमकडे असेल. 51 किलो गटात मेरी कोम भारताकडून आव्हान करेल. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकनंतर मेरी कोमलाही दुसरे पदक जिंकण्याची इच्छा आहे. मेरी कोम आता 38 वर्षांची झाल्यामुळे ती शेवटची ऑलिम्पिक खेळत आहे आणि पदक जिंकून ही स्पर्धा विस्मरणीय करण्याची तिची इच्छा असणार.
बॉक्सर्सची कामगिरी चांगली
आशिया चँपियन पूजा राणी मध्यम वजनाच्या 78 किलो वजनी खेळाडू भारताची प्रबळ दावेदार आहे. त्याशिवाय 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक जिंकणारी सिमरनजित कौर आणि लोव्हलिना बोरगोहेन (वेल्टरवेट 69 किलो) इतर महिला बॉक्सर आहेत. ज्यांच्याकडून पदक मिळण्याची अपेक्षा आहे.
पुरुष गटात विकास कृष्णा यादव (69 किलो), 2019 वर्ल्ड रौप्यपदक विजेता अमित पन्हाळ (52 किलो), 2014 आशिया खेळातील कांस्यपदक जिंकणारा सतीश कुमार (प्लस 91 किलो), 2018 राष्ट्रकुल स्पर्धेतील उपविजेता मनीष कौशल ( 63 किलो) आणि आशिष कुमार ( 75 किलो) आपापल्या गटात भारताचं प्रतिनिधित्व करतील.
सर्व नऊ बॉक्सर चांगले फॉर्ममध्ये आहेत आणि टोकियो ऑलिम्पिकपूर्वी अन्य स्पर्धांमध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. यावर्षी मे महिन्यात दुबईमध्ये झालेल्या एएसबीसी एशिया बॉक्सिंग स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि आठ कांस्यांसह एकूण 15 पदके जिंकली होती.
यापूर्वी काही महिन्यांपूर्वी डिसेंबर 2020 मध्ये बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये भारताने तीन सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकली होती. प्रथमच इतके बॉक्सर भारताच्या बाजूने पात्र ठरले आहेत.