(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paris Olympics 2024: मनू भाकर तिसऱ्या पदकाच्या शर्यतीत, 25 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक पटकावणार?
Shooting: भारताची नेमबाज मनू भाकर महिला 25 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिच्याकडून भारतीयांना तिसऱ्या पदकाची आशा आहे.
पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताची नेमबाज मनू भाकरनं (Manu Bhaker) महिला 25 मीटर एअर पिस्टल प्रकरात अंतिम फेरीत पोहोचली आहे. मनूनं यापूर्वी दोन पदकं जिंकली असून तिला तिसरं पदक मिळवण्याची संधी आहे. मनू भाकरनं यापूर्वी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताला पहिलं कांस्यपदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर सरबज्योत सह 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी मनू भाकरनं आणखी कांस्य पदक देशाला मिळवून दिलं. दोन कांस्य पदकांवर नाव कोरल्यानंतर देशातील नागरिकांना मनू भाकरनं सुवर्ण पदक जिंकेल अशी आशा आहे. याची अंतिम फेरीची लढत उद्या होणार आहे.
मनू भाकरनं ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल एकेरी मध्ये कांस्य पदक मिळवून दिलं होतं. यानंतर सरबज्योत सिंह याच्यासह मिश्र दुहेरीत मनू भाकरनं कांस्य पदक जिंकलं होतं. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली खेळाडू ठरली आहे.
मनू भाकरला सुवर्णपदकाची आशा
मनू भाकरनं 25 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता ती भारताला सुवर्णपदक मिळवून देते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
MANU BHAKER IN PARIS OLYMPICS 🤯
— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2024
- Bronze medal in 10m Air Pistol.
- Bronze medal in 10m Air Pistol mixed.
- Qualified into the final in 25m Air Pistol. pic.twitter.com/rXuTlcjjQI
मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्या जोडीनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं. त्यांनी दक्षिण कोरियाच्या की वोन्हो आणि ओह ये जिन यांना पराभूत केलं होतं. टोक्यो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मनू भाकर हिनं जोरदार कमबॅक करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. आता मनू भाकर तिसरं पदक जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय दोन कांस्य पदकं जिंकल्यानंतर सुवर्णपदक जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनू भाकर तिसरं पदक जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
दरम्यान, भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन पदक कांस्य पदकं जिंकली आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्व पदकं नेमबाजीत मिळालेली आहेत. दोन पदकं मनू भाकर, सरबज्योत सिंह आणि स्वप्नील कुसाळे यांनी मिळवलेली आहेत.
संबंधित बातम्या :