एक्स्प्लोर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकाचा एका आठवड्यात रंग उडाला; खेळाडूचा धक्कादायक दावा

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याची घटना घडली आहे.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची (Paris Olympics 2024) काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली. मात्र यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याची घटना घडली आहे. ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मिन हार्परने पदकाचा रंग उडाल्याचा दावा केला आहे. यास्मिन हार्परने सोशल मीडियावर रंग निघालेल्या कांस्य पदकाचा फोटोही शेअर केला आहे. यास्मिनने 100 मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पदकाचा रंग उडाल्याचं म्हटलं आहे. हे ऑलिम्पिक पदक नवे करकरीत असतानाच चांगले वाटते. पण थोड्या वेळाने आपल्या त्वचेवरील घाम या पदकावर लागल्यानंतर आणि मित्रांकडे काहीवेळ दिल्यानंतर या पदकाचा दर्जा समोर दिसून येतो. हे पदक मिळून केवळ एक आठवडाच झाला आहे. बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा, असं नायजा हस्टनने म्हटलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by JAH (@nyjah)

अमेरिकेने पटकावले सर्वाधिक पदके-

ऑलिम्पिकच्या पदकतालिकेवर नजर टाकल्यास अमेरिका अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेने एकूण 126 पदके जिंकली असून यामध्ये 40 सुवर्णपदक, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदके जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनने एकूण 95 पदके जिंकली आहेत. यामध्ये 40 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक जिंकली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे.

लिंग वादात अडकलेल्या इमाने खलीफ सुवर्णपदक जिंकलं-

अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने (Imane Khelif) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटात चीनच्या यांग लिऊचा पराभव करून ही कामगिरी केली. या विजयासह इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान इमाने खलीफवरुन गेल्या दिवासांपासून वाद रंगला होता.

संबंधित बातमी:

विनेश फोगाटच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सीएएसही पेचात; पदक मिळणार जवळपास निश्चित?, महत्वाची माहिती समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on El Nino: 2027 पर्यंत 'एल निनो'चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'ॲक्शन प्लॅन'
2027 पर्यंत 'एल निनो'चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'ॲक्शन प्लॅन'
Devendra Fadnavis: लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक दावा,राष्ट्रवादीवरही बोलले
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक दावा,राष्ट्रवादीवरही बोलले
Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on El Nino: 2027 पर्यंत 'एल निनो'चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'ॲक्शन प्लॅन'
2027 पर्यंत 'एल निनो'चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'ॲक्शन प्लॅन'
Devendra Fadnavis: लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक दावा,राष्ट्रवादीवरही बोलले
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक दावा,राष्ट्रवादीवरही बोलले
Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
NCP Merger in Congress: राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर विचारमंथन, राज्यातील नेत्यांना...
राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर विचारमंथन, राज्यातील नेत्यांना...
Devendra Fadnavis: पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
Mumbai Local Train: ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ठप्प, प्रवासी ट्रॅकवर उतरले
ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ठप्प, प्रवासी ट्रॅकवर उतरले
FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको आणि दक्षिण कोरियाची विजयी सलामी, स्पर्धेतील पहिला गोल कोणाच्या नावावर?  
फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको आणि दक्षिण कोरियाची विजयी सलामी, स्पर्धेतील पहिला गोल कोणाच्या नावावर?  
Embed widget