Neeraj Chopra on Paralympics: : पॅराऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं नीरज चोप्राकडून अभिनंंदन, भारतीयांना केलं 'हे' आवाहन
नीरज चोप्राने आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन पॅराऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच भारतीयांनी पॅराऑलिम्पिकला फॉलो करावं असं आवाहनही नीरज चोप्राने केलं आहे.
![Neeraj Chopra on Paralympics: : पॅराऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं नीरज चोप्राकडून अभिनंंदन, भारतीयांना केलं 'हे' आवाहन Neeraj Chopra congratulates players at Paralympics, releases video, know in details Neeraj Chopra on Paralympics: : पॅराऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं नीरज चोप्राकडून अभिनंंदन, भारतीयांना केलं 'हे' आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/10/59695bea52a530c8abe8c1acaaca2bad_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टोकियो पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. अवनी लखेरा आणि सुमित अंतिल यांनी दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन पॅराऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच भारतीयांनी पॅराऑलिम्पिकला फॉलो करावं असं आवाहनही नीरज चोप्राने केलं आहे.
नीरज चोप्राने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, अवनीने सुवर्ण पदक जिंकलं, सुमित अंतिलने विश्वविक्रम करत सुवर्ण पदक जिंकलं. देवेंद्र, सुंदरने देखील चांगली कामगिरी केली, सर्वच खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. पण मला वाटतं आपण सर्व पॅराऑलिम्पिकला म्हणावं तेवढं फॉलो करत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण पॅराऑलिम्पिकला फॉलो करावं. कारण ते कठीण परिस्थितीत आपल्या देशासाठी तिथे खेळत आहेत आणि मेडलही जिंकत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पॅराऑलिम्पिक फॉलो करा आणि त्यांना सपोर्ट करा. जेणेकरुन भारतीय खेळ आणखी उंचावेल, असं आवाहन नीरज चोप्राने सर्व भारतीयांना केलं.
View this post on Instagram
सुमित अंतिल आणि अवनी लखेराची सुवर्ण कामगिरी
भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला. तर आधी नेमबाज अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.
टोकियो पॅराॉलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे. पहिल्या दिवसापासूनच भारताचं प्रदर्शन शानदार होतं. सध्या भारत मेडल टेबलमध्ये 25 व्या स्थानावर आहे. तर 54 सुवर्ण पदकांसह चीन या यादीत अव्वल स्थानी आहे.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)