Avani Lekhara wins Gold : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी; 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक
Avani Lekhara wins Gold : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखरानं पटकावलं सुवर्ण पदक.
Avani Lekhara wins Gold : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे.
अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यासोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं तिसरं पदक निश्चित झालं आहे. यापूर्वी निषाद कुमारनं उंच उडी आणि भाविना पटेलनं टेबल टेनिसमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. भारताचा आणखी एक पॅरा अॅथलिट्स विनोद कुमार यांनं थाळीफेकमध्ये F52 कॅटेगरीमध्ये कांस्यपदक कमावलं आहे, परंतु हा निकाल अद्याप होल्डवर ठेवण्यात आलं आहे.
अवनीची चिनच्या खेळाडूवर मात
नऊ राऊंडच्या या अंतिम सामन्यात अवनी आणि चिनी अॅथलिट्स सी झांग यांच्यात अटितटीची लढत पाहायला मिळाली. झांगनं क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यामुळे या सामन्यात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून झांगकडे पाहिलं जात होतं. दरम्यान, अवनीनं अचूक वेध साधत झांगचं आव्हानं संपुष्टात आणलं आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अवनीनं नऊ राउंडमध्ये 52.0, 51.3, 21.6, 20.8, 21.2, 20.9, 21.2, 20.1, 20.5 सह एकूण 249.6 गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.
पॅरालिम्पिकमध्ये योगेश कठुनियाची कमाल, थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक
टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Yogesh Kathuniya : पॅरालिम्पिकमध्ये योगेश कठुनियाची कमाल, थाळीफेकमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्यपदक