Olympics 2024 Manu Bhaker: नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावलं कांस्य पदक
Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे.
Paris Olympics 2024: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, असं मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितलं.
🇮🇳🥉 𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘 𝗕𝗥𝗜𝗟𝗟𝗜𝗔𝗡𝗖𝗘! Manu Bhaker wins India's first medal at #Paris2024 and what a way to do so! From heartbreak at Tokyo to winning a Bronze at Paris, Manu Bhaker's redemption story has been wonderful to witness.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024
🔫 A superb effort from her and here's hoping… pic.twitter.com/O7tqOuGFTa
फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर
पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.
नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.
सरबज्योत, अर्जुन यांची संधी हुकली-
सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंह चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवू शकेल नाहीत. सरबज्योत पात्रता फेरीत 577 गुणांसह नवव्या स्थानावर, तर अर्जुन 574 गुणांसह 18व्या क्रमांकावर राहिला.
रमिता जिंदालचा 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश
10 मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने इतिहास रचला आहे. रमितान जिंदालने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रमिता जिंदाल 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धेक ठरली आहे. 20 वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 631.5 गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत 100 पेक्षा जास्त गुण मिळवले.
संबंधित बातमी:
Olympics 2024: रमिता जिंदालने रचला इतिहास; 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश