Golf : गोल्फ कसा खेळला जातो? माहिती नसेल तर हे वाचा...
Golf : अदिती अशोकच्या या कामगिरीमुळं गोल्फ प्रकाराकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र गोल्फ कसा खेळला जातो याबाबत अनेकांना माहिती नाही. त्याबाबत जाणून घेऊया..
Aditi Ashok in Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अदिती अशोक या खेळाडूनं भारताकडून दमदार खेळी करत या खेळ प्रकारात भारताला पदकाच्या जवळ नेलं आहे. भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकची अंतिम फेरीत दमदार खेळी सुरु आहे. गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारतीय खेळाडूची ताकद अभिमानास्पद आहे. अदिती अशोकच्या या कामगिरीमुळं गोल्फ प्रकाराकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र गोल्फ कसा खेळला जातो याबाबत अनेकांना माहिती नाही. त्याबाबत जाणून घेऊया..
गोल्फ कसा खेळला जातो?
सुरुवातीपासून बेसिक माहिती आपल्याला माहित आहे की गोल्फमध्ये एक स्टिक असते, एक बॉल असतो आणि तो समोर दिसणाऱ्या होलमध्ये कमीत कमी प्रयत्नात घालायचा असतो.
आता हेच जरा टेक्निकल भाषेत जाणुयात. तर ऑलिम्पिक गोल्फमध्ये असे एकूण 18 होल असतात आणि त्या हॉलच्या काठिण्य पातळीनुसार ते किती स्ट्रोकमध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे यानुसार त्याला तीन चार आणि पाच असे गुण दिलेले असतात. असे मिळून रोजच्या राऊंड मध्ये हे अठरा गोल मिळून 71 गुण असतात (असे 4 दिवस 4 राउंड म्हणजे 18×4 =72) थोडक्यात यात एकाद्या होलसाठी अपेक्षित असणाऱ्या स्ट्रोकच्या संख्येइतकेच स्ट्रोक एखाद्या खेळाडूने घेतले तर त्याला Par म्हणायचं. एखाद्या खेळाडूने अपेक्षित असणाऱ्या स्ट्रोकपेक्षा जर एक कमी स्ट्रोक नि जर बॉल त्या होल मध्ये घातला तर त्याला Birdie म्हणतात.
अशाच प्रकारे एखाद्या होलसाठी अपेक्षित प्रयत्न पेक्षा 2 कमी स्ट्रोकने बोल होलमध्ये घातल्यास त्याला Eagle म्हणतात याउलट अपेक्षित प्रयत्नांपेक्षा एक स्ट्रोक जास्त लागला तर त्याला Bogie म्हणतात दोन प्रयत्न जास्त लागले तर त्याला डबल bogie म्हणतात (जे की स्कोरच्या दृष्टीने सहाजिकच वाईट असतं)
म्हणजे बघा रोजच्या राउंडमध्ये 71 हा पार स्कोर झाला परंतु आदितीने कालपर्यंत 67, 66, 68 असा स्कोर तीन दिवस केला. म्हणजेच 71 पेक्षा चार,पाच आणि तीननं कमी म्हणजेच त्या तिन्हीची बेरीज झाली बारा आणि तिचा स्कोर झाला 12 under par म्हणजेच जितके प्रयत्न अपेक्षित आहेत त्याच्यापेक्षा तिने बारा प्रयत्न कमी घेतले आहेत.
आणि ती सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असणाऱ्या अमेरिकेच्या nelly korda चा स्कोर पंधरा अंडर पार आहे म्हणजेच आदिती पेक्षा तिने तीन प्रयत्न कमी घेतले तर अदितीच्या खालच्या स्थानावर असलेले स्पर्धक 10 under par या स्कोर चे आहेत म्हणजेच त्यांनी आदिती पेक्षा दोन प्रयत्न जास्त घेतलेत..
थोडक्यात सारांश सांगायचा तर आदिती आजच्यासारखी चांगलं खेळली तर ही दोनची लीड सुद्धा खूप चांगली झाली आणि तिला किमान सिल्वर मेडल तरी नक्की मिळेल!