मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 1038 उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत 19 प्रभागांतील एकूण 135 अर्ज बाद ठरले आहेत.

जळगाव : राज्यातील महापालिका निवडणुकांध्ये (Election) उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत आहे. जळगाव (Jalgaon) मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक 18 अ मधील उमेदवार तथा आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. कारण, येथील गौरव सोनवणेंच्या विरोधातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहे. राज्याचे भाजपचे 6 उमेदवार विजयी झाल्यानंतर आता जळगावत शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी झाल्याने महायुतीचे राज्यात 7 उमेदवार बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, शिंदेंच्या शिवसेनेनं (Shivsena) आज खातं उघडलं आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 1038 उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत 19 प्रभागांतील एकूण 135 अर्ज बाद ठरले आहेत. एकूण 903 अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी आणि राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले. याचा सर्वात मोठा फटका भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे यांना बसला. त्यांच्या एबी फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. परंतु, सुदैवाने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यामुळे त्या आता भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील. त्यासह, जळगावातील प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये आमदारपुत्र बिनविरोध झाल्याने सर्वांनी आश्चर्य
व्यक्त केले आहे.
आमदारपुत्र बिनविरोध, ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज मागे
भाजपचे कल्याण डोंबिवलीत 3, पनवेलमध्ये 1, धुळ्यात 2 उमेदवार बिनविरोध आले आहेत, त्यानंतर आता शिंदेंचा जळगावचा उमेदवार बिनविरोध झाला आहे. जळगाव मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक 18 अ मधील उमेदवार तथा आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. कारण, येथील गौरव सोनवणेंच्या विरोधातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहे.
जळगावात राष्ट्रवादीच्या महानगरप्रमुखाचा राजीनामा
जळगाव मनपा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिवारात उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विकल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगर प्रमुख अभिषेक पाटील यांनी अजित पवार यांना लेखी पत्र देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जळगावात युतीचं जागावाटप
जळगावात काही दिवसापूसन युती होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज जळगावात महायुतीची घोषणा झाली आहे. भाजप 46, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 6, शिवसेना (शिंदे गट) 23 जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवारांची आयात-निर्यात करण्यात आली आहे. उमेदवारीवरून भाजपात नाराजी असून ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.




















