(Source: ECI/ABP News/ABP Majha)
History in Chennai : हिटमॅन रोहित जो पराक्रम शून्य मिनिटात करतोय, तोच करण्यासाठी पाकिस्तानच्या अख्ख्या टीमला 1168 चेंडू लागले!
अफगाणिस्तानने आपल्या प्लेइंग-11 मध्ये अतिरिक्त फिरकीपटूला संधी दिली आहे. वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीच्या जागी फिरकीपटू नूर अहमदचा समावेश करण्यात आला आहे.
चेन्नई : वर्ल्डकपमध्ये ( ICC Cricket World Cup 2023) आज पाकिस्तानची लढत अफगाणिस्तानविरुद्ध (Pakistan vs Afghanistan) होत आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शादाब खान पाकिस्तानच्या प्लेइंग-11 मध्ये परतला आहे. मोहम्मद नवाजच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शादाबला पुन्हा संधी मिळाली आहे.
Rohit Sharma has scored 234 runs through boundaries from 311 runs he scored in World Cup 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2023
- Hitman, A boundary hitting machine. pic.twitter.com/XNoFLocmLp
दुसरीकडे, अफगाणिस्तानने आपल्या प्लेइंग-11 मध्ये अतिरिक्त फिरकीपटूला संधी दिली आहे. वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीच्या जागी फिरकीपटू नूर अहमदचा समावेश करण्यात आला आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने अफगाणिस्तानने फिरकीपटूला संधी दिली आहे. त्यामुळे आज अफगाणिस्तान संघातील चार फिरकीपटू मैदानात दिसणार आहेत.
पाकिस्तानचा पाॅवर प्लेमध्ये 1168 चेंडू नंतर सिक्स!
दरम्यान, आज अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये 1168 चेंडूनंतर पहिल्या सिक्सची नोंद झाली. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीकने पाचव्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर नावीन उल हकला षटकार ठोकला. दुसरीकडे, हाच पराक्रम टीम इंडियाचा हिटमॅन कॅप्टन रोहित शर्मा करत आहे. रोहितने मागील पाच सामन्यात पाॅवरप्लेमध्ये तब्बल 197 धावा कुटल्या आहेत. यामध्ये रोहितने 22 चौकार आणि 12 षटकारांची आतषबाजी केली आहे. रोहितने पाॅवरप्लेमध्ये 134 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.
PAKISTAN HAS HIT THEIR FIRST SIX IN POWERPLAY IN ODI IN 2023....!!!!! pic.twitter.com/DLxVNzxQf4
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2023
दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांत पाकिस्तानला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने 7 गडी राखून आणि ऑस्ट्रेलियाचा 62 धावांनी पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान आज चेन्नईत विजयासाठी प्रयत्न करेल. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धही त्यांना तगडी फाईट द्यावी लागणार आहे. अफगाणिस्तानची गोलंदाजी तुलनेत मजबूत आहे.
Rohit Sharma in Powerplay in World Cup 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2023
Innings - 5
Runs - 197
Average - 197
Strike Rate - 134
fours - 22
Sixes - 12
Hitman has turned into a beast in Powerplay, one of the major reasons for India's unbeaten run. pic.twitter.com/HeKUkKctL0
दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी आतापर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही. गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानने चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे चाहत्यांना पाकिस्तानविरुद्ध चांगल्या कामगिरीची आशा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या