एक्स्प्लोर
विल्यमसन एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज
विल्यमसनने 67 धावा करत एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टिलच्या नावे होता.
World Cup 2019 : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील पहिल्या उपान्त्य सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर मार्टिन गप्टिल अवघ्या एका धावेवर तंबूत परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन मैदानात उतरला. विल्यमसन एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला आहे.
मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफॉर्ड न्यूझीलंड फलंदाजी करत असताना 47 व्या षटकात पावसामुळे खेळ थांबवावा लागला. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली. बुमराहने गप्टिलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडल्यावर विल्यमसन मैदानात उतरला. त्यानंतर विल्यमसनने 67 धावा करत एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टिलच्या नावे होता.
रॉस टेलर आणि विल्यमसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर किवींनी दोनशे धावांचा टप्पा ओलांडला.
यंदाच्या विश्वचषकात विल्यमसनने चांगली फलंदाजी केली आहे. त्याने यावेळी दोन शतकं रचत संघाची बॅटिंग लाईन अप व्यवस्थित राखली आहे.
दरम्यान, विल्यमसन हा विश्वचषकात 500 धावांचा टप्पा ओलांडणारा न्यूझीलंडचा दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी मार्टिन गप्टिल हा विश्वचषकात पाचशे धावांची मजल मारणारा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज होता.
2015 च्या विश्वचषकात द्विशतक ठोकणाऱ्या गप्टिलने एकूण 547 धावा ठोकल्या होत्या. त्याच्याआधी स्टॉक स्टायरिस (2007 मध्ये 499 धावा) च्या नावे हा विक्रम होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement