'दोबारा कभी नहीं जाऊंगा पाकिस्तान...', एअरपोर्टवरच स्टार क्रिकेटर ढसाढसा रडू लागला, पाकिस्तानातील स्फोटांमुळे घाबरलेला
India Pakistan Tension: भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान जेव्हा पीएसएल क्रिकेटर्स दुबई विमानतळावर उतरले, तेव्हा एका परदेशी क्रिकेटरनं जे म्हटले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी युद्धबंदीवर (India Pakistan Ceasefire) सहमती दर्शवली. यापूर्वी दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र डागण्यात आली होती आणि भरपूर बॉम्बस्फोट झालेले, दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पीएसएल 2025 (PSL 2025) पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्यानंतर PSL 2025 मध्ये सहभागी झालेल्या सर्व परदेशी खेळाडूंना विमानानं पाकिस्तानहून दुबईला आणलं गेलं.
दुबई विमानतळावर उतरल्यानंतर बांगलादेशी खेळाडू रिशाद हुसेननं आपला थराराक अनुभव सांगितला. त्यासोबतच त्यानं आपल्या सहकारी क्रिकेटपटूंबाबतही सांगितलं. त्यानं सांगितलं की, त्याचा सहकारी क्रिकेटपटू नाहिद राणा कसा थरथरत होता, हेसुद्धा त्यानं सांगितलं. तसेच, त्यानं एका परदेशी खेळाडूबाबतही सांगितलं. त्यानं सांगितलं की, तो कधीही पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवणार नाही.
क्रिकबझच्या मते, दुबई विमानतळावर उतरल्यानंतर, रिशाद हुसेननं पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "सॅम बिलिंग्ज, डॅरिल मिशेल, कुसल परेरा, डेव्हिड वीस आणि टॉम करनसह सर्व खेळाडू खूप घाबरले होते. दुबईत उतरल्यानंतर, डॅरिल मिशेलनं मला सांगितलं की, तो पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाही, विशेषतः अशा संकटाच्या काळात तर नाहीच नाही, मग काहीही होऊ देत."
ढसाढसा रडू लागला क्रिकेटर
रिशा हुसेननं असंही सांगितलं की, जेव्हा टॉम कर्रनला कळलं की, पाकिस्तानातील विमानतळ बंद करण्यात आलंय, त्यावेळी तो ढसाढसा रडू लागला. टॉम कर्रन लहान मुलासारखा रडू लागला आणि त्याला शांत करण्यासाठी दोघा-तिघांची गरज लागली.
बांगलादेशचा खेळाडू रिशाद हुसेन म्हणाला की, दुबईत उतरल्यानंतर त्याला बातमी मिळाली की, त्याच्या विमानानं पाकिस्तान विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांतच विमानतळावर हल्ला झाला. मृत्यूपासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर असल्यानं, दुबईला आल्यानंतर आम्हा सर्वांना दुसरं जीवन मिळाल्यासारखं वाटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























