भारतीय लष्करात असणाऱ्या वडिलांना दहशतवाद्यांनी हालहाल करुन मारलं, तेव्हापासून ठरवलं काश्मीरला कधीच जायचं नाही, बॉलीवूडच्या अभिनेत्रीसोबत काय घडलं होतं?
Actress Father Killed By Terrorists: बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांना दहशतवाद्यांनी हालहाल करुन मारलेलं. अभिनेत्रीनं अनेक मुलाखतींमध्ये बोलताना याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.

Actress Father Killed By Terrorists: फिल्म इंडस्ट्रीतील (Bollywood Actress) अनेक कलाकार या ना त्या कारणानं भारतीय लष्कराशी (Indian Army) जोडले गेलेले आहेत. कुणी स्वतः लष्करात होतं, तर कुणाचे आजोबा लष्करात होते. कुणाच्या वडिलांनी लष्कर सेवेत रुजू होते. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिचे वडीलही लष्करी अधिकारी होते. पण, एका दहशतवादी कारवाईत त्यांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांनी त्यांना अत्यंत निर्घृणपणे मारलं. अभिनेत्रीनं अनेक मुलाखतींमध्ये बोलताना याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.
आम्ही ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव निमरत कौर (Nimrat Kaur). काही दिवसांपूर्वी निमरतचं नाव अभिषेक बच्चनसोबत (Abhishekh Bacchan) जोडलं गेलं होतं. त्यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. निमरत कौरचे वडील लष्करात होते. तिच्या वडिलांचं नाव मेजर भूपेंद्र सिंह. 1994 मध्ये काश्मीरात दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. ज्यावेळी अभिनेत्रीनं वडील मेजर भूपेंद्र यांनी दहशतवाद्यांच्या नापाक मागण्या मान्य करण्यास नकार दिला, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. तेव्हा त्यांचं वय फक्त 44 वर्ष होतं. तर, ज्यावेळी वडील शहीद झाले, त्यावेळी निमरतचं वय फक्त 12 वर्ष होतं.
काश्मीरमधील वर्कस्टेशनमधून निम्रत कौरच्या वडिलांचं अपहरण
निमरत कौरनं ईटाइम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितलं होतं. ती म्हणालेली की, "ते एक तरुण आर्मी मेजर होते, वेरीनाग येथील आर्मीच्या सीमावर्ती रस्त्यांवर ते तैनात होते. काश्मीर हे कुटुंबासाठी योग्य ठिकाण नव्हतं, म्हणून जेव्हा त्यांची पोस्टिंग काश्मीरला झालेली, त्यावेळी आम्ही पटियालातच राहायचो. जानेवारी 1994 मध्ये, आम्ही आमच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या वडिलांना भेटण्यासाठी काश्मीरला गेलेलो, त्यावेळी हिजबुल मुजाहिदीननं त्यांचं त्यांच्या वर्कस्टेशनवरून अपहरण केलं आणि सात दिवसांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकलं.

दहशतवाद्यांनी केलेल्या अनेक मागण्या
निमरत कौरनं पुढे बोलताना सांगितलं की, दहशतवाद्यांनी तिच्या वडिलांना सोडण्यासाठी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये तिच्या वडिलांना सोडण्यासाठी त्यांना इतर काही दहशतवाद्यांना सोडावं लागणार होतं. आपल्या देशाकडून मागणी मान्य केली नाही. अभिनेत्रीनं सांगितलं की, ज्यावेळी माझे वडील शहीद झाले, त्यावेळी ते फक्त 44 वर्षांचे होते. आम्हाला ज्यावेळी कळालं की, "ते शहीद झालेत, त्यावेळी आम्ही त्यांचं पार्थीव घेऊन दिल्लीला परतलो आणि मी त्यांचं पार्थीव पहिल्यांदा दिल्लीत पाहिलेलं."
दरम्यान, निमरत कौर सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कुल' या मालिकेमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीनं यापूर्वी 'स्काय फोर्स', 'दसवी', 'साजन शिंदे का व्हायरल व्हिडीओ' आणि 'एअरलिफ्ट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























