एक्स्प्लोर

Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर

World Athletics Championship 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

World Athletics Championship 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झालाय. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी याबाबत माहिती दिलीय. 

ट्वीट-

दुखापतीमुळं नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर
भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धा येत्या 28 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत खेळली जाणार आहे. 

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्राची दमदार कामगिरी
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेक स्पर्धेतील अंतिम फेरीतील अखेरच्या प्रयत्नांत नीरज चोप्रानं यश मोठं मिळवत भारतासाठी रौप्यपदक जिंकलं. नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 90.54 मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. तर, चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब व्हॅडलेचनं 88. 09 मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावलंय. 

नीरज चोप्राच्या दुखापतीनं भारताची चिंता वाढवली
भारताचं प्रतिनिधित्व करणारा भालेफेकपटून नीरज चोप्रा सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवत आहे. गेल्या महिन्यात 2022 चा हंगाम सुरू करणाऱ्या नीरजनं तीन स्पर्धांमध्ये दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडलाय. त्यानं फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडून हंगामाची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं क्युर्टेन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं. तसेच स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकून दुसरा क्रमांक पटकावत पुन्हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यानंतर नुकतीच पार पडलेली वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकून 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. तसेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत त्याच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती. परंतु, दुखापतीमुळं त्याला कॉमनवेल्थ स्पर्धेला मुकावं लागणार आहे. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget