Neeraj Chopra on Radhika Yadav : राधिका यादवच्या हत्येवर नीरज चोप्राने मौन सोडलं, संतापून म्हणाला, हरियाणातील कुटुंबामध्ये तुम्ही...
भारताची स्टार टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येच्या (Radhika Yadav Murder) बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे आणि देशभरात खळबळ उडाली.

Neeraj Chopra on Radhika Yadav : भारताची स्टार टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येच्या (Radhika Yadav Murder) बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे आणि देशभरात खळबळ उडाली. राधिकाच्या वडिलांनी स्वतःच्या मुलीची गोळी झाडून हत्या केली. अवघ्या 25 व्या वर्षी राधिकाने टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. आता भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना गुरुग्राममधील आहे आणि राधिकाच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
राधिका यादवच्या हत्येनंतर नीरज चोप्राची प्रतिक्रिया!
राधिका यादवच्या मृत्यूमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नीरज चोप्रा एनडीटीव्हीशी बोलताना यावर म्हणाला की, या घटनेपूर्वी मी काही लोकांशी बोलत होतो. हरियाणातील महिला क्रीडपटूंनी देशात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. देश त्यांच्याकडे आदराने पाहतो. कुटुंबामध्ये आपण एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच महिला खेळाडूंचा आदर राखत त्यांना आदर्श मानले पाहिजे.
राधिका यादवला वडिलांनी का मारले?
राधिकाचे वडील दीपक यादव यांना पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे आणि त्यांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. दीपक म्हणाले की, त्यांना त्यांच्या मुलीची कमाईवर खावी लागली हे ऐकून ते कंटाळले होते. पोलिसांच्या निवेदनानुसार, राधिका चालवत असलेली टेनिस अकादमी हे दोघांमधील मतभेदाचे मुख्य कारण होते.
अशीही एक बातमी आली होती की, राधिकाचे वडील तिच्या रील बनवण्यावर खूश नव्हते. पण, दीपक यादव वेगवेगळीच बोलत आहेत. पोलिस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. 10 जुलै ज्या दिवशी राधिकाची हत्या झाली, त्या दिवशी तिच्या आईचा वाढदिवसही होता. ही भारतीय टेनिस स्टार स्वयंपाकघरात काहीतरी शिजवण्यासाठी गेली होती, तेव्हा दीपक यादवने तिच्या मुलीला एकामागून एक गोळ्या घालून संपवलं.
कोण होती राधिका यादव?
राधिका यादवची आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF)मध्ये दुहेरी रँकिंगमध्ये 113 व्या क्रमांकावर होती. महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणामध्ये पाचव्या क्रमांकावर होती. राधिका 22 जानेवारी 2018 रोजी एआयटीए मुलींच्या 18 वर्षांखालील गटात 75 व्या स्थानावर पोहोचली होती आणि टॉप 100 मध्ये ती 11 आठवडे होती. हरियाणाची असलेली ती एआयटीए महिला दुहेरीत टॉप 100 मध्ये स्थान मिळवणाऱ्या राज्यातील फक्त चार खेळाडूंपैकी एक होती.
हे ही वाचा -
























