एक्स्प्लोर
150 कोटींसाठी महेंद्रसिंह धोनीची कोर्टात धाव
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रिअल इस्टेट ग्रुप आम्रपालीकडून 150 कोटी वसूल करण्यासाठी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रिअल इस्टेट ग्रुप आम्रपालीकडून 150 कोटी वसूल करण्यासाठी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, धोनी हा आम्रपाली ग्रुपचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असताना त्याला त्याचा मोबदला देण्यात आला नाही.
धोनी आम्रपाली ग्रुपचा तब्बल 6 वर्ष ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होता. पण 2016 साली धोनीने त्यांची साथ सोडली. हाऊसिंग प्रोजेक्ट वेळेत पूर्ण न होणं आणि लोकांना वेळेवर घराचा ताबा न मिळणं या कारणांमुळे धोनीने आम्रपाली ग्रुपची साथ सोडली होती.
आम्रपाली ग्रुपच्या कारभाराने धोनीच्या इमेजलाही धक्का बसला होता. आम्रपाली ग्रुपकडून घर खरेदी करणाऱ्यांनी धोनीला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं होतं. त्यानंतर धोनीने आम्रपाली ग्रुपची साथ सोडली होती.
दरम्यान, धोनीची कंपनी रिती स्पोर्ट्सने दिल्ली हायकोर्टात आम्रपाली ग्रुपविरोधात दावा ठोकला आहे. रिती स्पोर्ट्सच्या मते, कंपनीला आम्रपाली ग्रुपकडून 200 कोटी रुपये येणं बाकी आहे.
याप्रकरणी रिती स्पोर्ट्सचा व्यवस्थापकीय संचालक अरुण पांडेंचं म्हणणं आहे की, 'आम्रपाली ग्रुपने ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग कामाचे पैसे आम्हाला चुकते केले नाही.'
रिती स्पोर्ट्स भारतासह परदेशी खेळाडूंच्या मॅनेजमेंटचंही काम पाहतं. या यादीत धोनी, केएल राहुल, भुवनेश्वर कुमार आणि द. आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसी यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement