एक्स्प्लोर
धोनीने भरला सर्वाधिक इनकम टॅक्स
फोर्ब्स मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार जगातील पहिल्या शंभर श्रीमंत खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे.
मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठमोठे पराक्रम गाजवले आहेत. पण फक्त मैदानापुरतेच मर्यादित न राहता धोनीने मैदानाबाहेरही आपला पराक्रम गाजवला आहे.
आयकर विभागाच्या अधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी हा बिहार आणि झारखंड मधील सर्वाधिक टॅक्स भरणारा व्यक्ती ठरला आहे. धोनीने 2017-18 या वर्षी 12.17 कोटी रुपये इतका टॅक्स भरला आहे. या पूर्वीसुद्धा धोनीने 2016-17 या वर्षात 10.93 कोटी इतका टॅक्स भरला होता.
फोर्ब्स मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार जगातील पहिल्या शंभर श्रीमंत खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. तर फोर्ब्सनुसार 2015 साली धोनीची कमाई 111 दशलक्ष डॉलर्स एवढी होती.
धोनीने कर्णधारपद सोडले असले तरी देखील तो बीसीसीआयच्या ‘अ’ दर्जाच्या खेळाडूंमध्ये करारबद्ध आहे. याशिवाय आयपीएल आणि जाहिरातींमधून देखील धोनीला मानधन मिळते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement