एक्स्प्लोर
एकाच सामन्यात दोन हॅटट्रिक, मिचेल स्टार्कचा विक्रम
प्रथम श्रेणीच्या सामन्यात दोन हॅटट्रिक घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं एकाच सामन्यात दोन हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला आहे.
प्रथम श्रेणीच्या सामन्यात दोन हॅटट्रिक घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या शेफिल्ड शिल्ड सामन्यात ही कामगिरी बजावली.
न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना स्टार्कनं पहिल्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेनडॉर्फ, डेव्हिड मूडी, सायमन मॅकिन या फलंदाजांना लागोपाठच्या तीन चेंडूवर माघारी धाडलं.
मग दुसऱ्या डावात त्यानं बेहरेनडॉर्फ, मूडी आणि जोनाथन वेल्स यांची विकेट घेत स्टार्कनं दुसरी हॅटट्रिक साजरी केली. स्टार्कच्या या कामगिरीच्या जोरावर न्यू साऊथ वेल्सनं 171 धावांनी विजय मिळवला.
प्रथम श्रेणी सामन्यात दोन हॅटट्रिक घेणारा स्टार्क ऑस्ट्रेलियाचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
https://twitter.com/thefield_in/status/927822979056091136
https://twitter.com/CricketNetwork/status/927373005419716611
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement