Asian Championship: मीराबाई चानू, जेरेमी लालरिननुंगा, अचिंता शेउली आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाहीत; कारण काय?
Asian Championship:कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मीराबाई चानू, जेरेमी लालरिननुंगा, अचिंता शेउली यांच्यासह सात स्टार खेळाडू आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.
Asian Championship: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू (Mirabai Chanu) आणि इतर सात शीर्ष भारतीय वेटलिफ्टर्स सेंट लुईस येथे साडेतीन आठवड्यांच्या स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी मंगळवारी अमेरिकेला रवाना होतील. मीराबाई चानू सोबत 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेते जेरेमी लालरिन्नुंगा (Jeremy Lalrinnunga), अचिंता शेउली (Achinta Sheuli), संकेत सरगर (Sanket Sargar), बिंद्याराणी देवी (Bindyarani Devi), गुरदीप सिंह (Gurdeep Singh) आणि 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन आर.व्ही. राहुल (R.V Rahul) आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेते झिली दलबेहेरा सेंट लुईला भेट देतील.
वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, "आम्ही 23-24 दिवस अमेरिकेत असणार आहेत. येथे आम्ही स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊ". राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान कोपराच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया झालेला सरगर रिहॅबिलिटेशनमध्ये सहभागी होणार आहे. "कॉमनवेल्थ स्पर्धेत या खेळाडूंना किरकोळ दुखापत झालीय. जसे की गुरदीपच्या मनगटाला दुखापत झाली आहे. संकेत रिहॅबिलिटेशनमध्ये भाग घेईल. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी प्रत्येकजण पूर्णपणे तंदुरुस्त असावा अशी आमची इच्छा आहे.” भारतातील वेटलिफ्टर डॉ. अॅरॉन हॉर्शिग, माजी वेटलिफ्टर आणि आता फिजिकल थेरपिस्ट आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक यांच्यासोबत काम करेल.
भारतीय वेटलिफ्टिंग संघानं या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण आणि रौप्यपदकांसह 10 पदके जिंकली. राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या लिफ्टर्सच्या कामगिरीवर शर्मांनी आनंद व्यक्त केला. परंतु, काही खेळाडूंचे थोडक्यात सुवर्णपदक गमावल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. सुवर्णपदकाचे दावेदार अजय सिंह, संकेतआणि पूनमचं थोडक्यात सुवर्णपदक हुकंल. खेळाडूंना आणखी चांगली कामगिरी करता आली असती, असं त्यांनी म्हटलंय.
भारतासाठी कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकलेले खेळाडू-
सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ, शरथ कमाल
रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन.
हे देखील वाचा-