(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milkha Singh Health : महान धावपटू मिल्खा सिंह यांची प्रकृती स्थिर, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस
Milkha Singh Health Update : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Health) यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर PGIMER चंदीगढमध्ये उपचार सुरु आहेत.
Milkha Singh Health Update : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Health) यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर PGIMER चंदीगढमध्ये उपचार सुरु आहेत. आज त्यांना तिथं दाखल करण्यात आलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंह यांच्याशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. पंतप्रधानांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंना आशीर्वाद व प्रेरणा मिळविण्यासाठी लवकरच परत येईल अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
दरम्यान आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. कोविड 19 मुळे आजारी असलेले धावपटू मिल्खा सिंग यांना आज PGIMER चंदीगढ येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती PGIMER चे प्रा.अशोक कुमार यांनी दिली.
Prime Minister Narendra Modi spoke to former Indian sprinter Milkha Singh & inquired about his health. PM wished him a speedy recovery and hoped he will be back soon to bless and inspire the athletes who are participating in the Tokyo Olympics. pic.twitter.com/2976HLvh5X
— ANI (@ANI) June 4, 2021
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र त्यांना 24 तारखेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. फ्लाइंग सिख नावानं प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांचं वय 91 वर्ष आहे. त्यांच्या पत्नीनं त्यांना कोरोना झाला असल्याचं स्पष्ट केलं होतं.
माहितीनुसार सर्वात आधी मिल्खा सिंह यांच्या कुकला ताप आला होता. त्यानंतर मिल्खा सिंह यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मिल्खा सिंह यांनी स्वत:ला घरात क्वारंटाईन केलं होतं.
मिल्खा सिंह यांनी सांगितलं होतं की, आमच्या घरातील काही हेल्पर पॉझिटीव्ह आले आहेत. त्यानंतर परिवारातील सर्व सदस्यांची आम्ही चाचणी केली. परिवारातील केवळ माझीच चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी पूर्णपणे ठीक आहे, मला कुठलीही लक्षणं नाहीत. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की, मी तीन चार दिवसात ठीक होईल, असं मिल्खा सिंह यांनी सांगितलं होतं, मात्र त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं.