एक्स्प्लोर

Maharashtra Olympic Games : जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत होणार खेळांचे आयोजन

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचं नुकतच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं आहे.

Maharashtra Sports News : भारतात अलीकडे क्रिकेटशिवाय इतर खेळांबाबतही जागुरकता वाढत असून नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं कमाल अशी कामगिरी केली. दरम्यान महाराष्ट्राचे खेळाडूही विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. अशात राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. 1 ते 12 जानेवारी या कालावधीत या स्पर्धा पार पडणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली.

या महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणाचा विचार करता पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत होणार असून, विविध अशा 39 क्रीडा प्रकार या स्पर्धेत खेळवले जाणार आहेत. क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्यााद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राज्यस्तर आयोजन समितीच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासह स्थळांची माहिती देण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सुहास दिवसे (आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे), रणजित देवोल (सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), चंद्रकांत कांबळे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय), तेजस्विनी सावंत (अर्जुन पुरस्कार विजेती नेमबाज), प्रदीप गंधे (ध्यानचंद पुरस्कार विजेते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष), निलेश जगताप (महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य) हे मान्यवरही उपस्थित होते.

कोणत्या खेळांचा होणार समावेश?

तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनोइंग आणि कयाकिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेमबाजी, रोइंग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग (रोड आणि ट्रॅक), नेटबॉल, सेपक टेकरॉ, स्क्वॉश, यॉटिंग अशा ३२ क्रीडा प्रकारांसह नुकत्याच गुजरात येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात क्रीडा प्रकारांचा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा-

FIFA WC 2022 : फिफा विश्वचषकाचे केवळ चार सामने शिल्लक, गोल्डन बूटच्या शर्यतीत कोणते खेळाडू आघाडीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget