FIFA WC 2022 : फिफा विश्वचषकाचे केवळ चार सामने शिल्लक, गोल्डन बूटच्या शर्यतीत कोणते खेळाडू आघाडीवर
Fifa World Cup : फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपून आता उपांत्य फेरीचे अर्थात सेमीफायनलचे सामने सुरु होत आहेत.
FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्ड कप (Fifa World Cup 2022) सध्या सुरु असून ग्रुप स्टेजनंतर राऊंड ऑफ 16 आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपून सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. एकूण 32 संघानी सहभाग घेत सुरु झालेल्या या स्पर्धेत आता केवळ चार संघ राहिले आहे. चार संघासह आता केवळ चार सामने यंदाच्या विश्वचषकात खेळायचे बाकी आहेत. अशा परिस्थितीत गोल्डन बूट पुरस्कारासाठी काही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कप 2022 मध्ये तीन खेळाडूंनी कमाल कामगिरी करत गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी चुरस वाढवली आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जात असून यंदा या शर्यतीत तीन खेळाडू आहेत. यामध्ये फ्रान्सचा कायलिन एम्बापे (kylian mbappe) ऑलिवर जिराऊड (olivier giroud) आणि अर्जेंटिना संघाचा लिओनल मेस्सी (lionel messi) यांचा समावेश आहे.
या तिघांमध्ये गोल्डन बूट पुरस्कारासाठी फ्रान्सचा एम्बापे आघाडीवर आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 5 गोल केले आहेत. तसंच फ्रान्सच्या जिराऊडनेही 4 गोल केले आहेत. तो देखील या शर्यतीत आहे. त्यात आता फ्रान्स सेमीफायनल खेळणार असल्याने कायलिन आणि जिराऊडच्या गोल्सची संख्या आणखी वाढू शकते. फ्रान्सचा सेमीफायनलचा सामना 15 डिसेंबरला मोरोक्कोविरुद्ध होणार आहे. या यादीत तिसरं नाव म्हणजेच महान फुटबॉल लिओनल मेस्सी. मेस्सीने 4 गोल आतापर्यंत केले असून तो या दोन्ही फ्रेंच खेळाडूंना मागे टाकू शकतो. अर्जेंटिना संघाचा आगामी सामना 14 डिसेंबरला क्रोएशियाविरुद्ध होणार आहे.
फिफाच्या सेमीफायनल सामन्याचं वेळापत्रक-
सामना | संघ | दिनांक | वेळ |
पहिला सेमीफायनलचा सामना | क्रोएशिया vs अर्जेंटीना | 14 डिसेंबर | रात्री उशिरा 12.30 वाजता |
दुसरा सेमीफायनलचा सामना | मोरक्को vs फ्रान्स | 15 डिसेंबर | रात्री उशिरा 12.30 वाजता |
हे देखील वाचा-