एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कसोटीत सलग 7 अर्धशतकं, राहुलने दिग्गजांचे विक्रम मोडले
कोलंबो कसोटीनंतर टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने तिसऱ्या कसोटीतही धडाकेबाज खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे कसोटीतील सलग सातवं अर्धशतक ठरलं. सलग सात वेळा अर्धशतक ठोकणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
पल्लीकल : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात के. एल. राहुलने शानदार अर्धशतक झळकावलं. हे त्याचं कसोटीतील सलग सातवं अर्धशतक ठरलं. त्याने या अर्धशतकासोबतच दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहेत.
राहुलच्या अर्धशतकांची मालिका यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरु कसोटीपासून सुरु झाली. त्यानंतर दुखापतीमुळे काही सामन्यांपासून राहुलला दूर रहावं लागलं. मात्र त्याच्या खेळीवर मैदानापासून दूर राहिल्याचा परिणाम बिलकुल जाणवला नाही. त्याने पुनरागमन करताच पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं.
भारताकडून सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे. गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी सहा सलग अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम आहे. केएल राहुलने दोघांचाही विक्रम मोडीत काढला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशकतं ठोकण्याच्या बाबतीत केएल राहुलने अँडी फ्लॉवर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा आणि ख्रिस रोजर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या सर्वांनी सलग 7 वेळा अर्धशतक ठोकलं आहे.
केएल राहुलची 7 अर्धशतकं
- मार्च 2017, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 धावा
- मार्च 2017, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 51 धावा
- मार्च 2017, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 67 धावा
- मार्च 2017, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 60 धावा
- मार्च 2017, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 51 धावा
- ऑगस्ट 2017, श्रीलंकेविरुद्ध 57 धावा
- ऑगस्ट 2017, श्रीलंकेविरुद्ध 50* धावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement