स्टार फुटबॉलर मेस्सीची बार्सिलोनाला नोटीस, क्लब सोडण्याचे संकेत
बार्सिलोना क्लबला मेस्सीने क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त करणारं एक नोटीस पाठवली आहे. चॅम्पिअन्स लीगमधून संघाचा दारून पराभव झाल्यानंतर मेस्सीने संघ व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त करत बार्सिलोना क्लबला नोटीस धाडल्याचं बोलंलं जात आहे.
लिस्बन : फुटबॉलमधील अनेक विक्रम आपल्या नावे करणारा बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार असल्याचं बोलंलं जात आहे. गेल्याच आठवड्यात खेळवण्यात आलेल्या चॅम्पिअन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिचकडून बार्सिलोनाचा 2-8 असा पराभव झाल्यानंतर मेस्सीने हा निर्णय घेतल्याचं वृत्त काही स्पॅनिश वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे. तसेच चॅम्पिअन्स लीगमधून संघाचा दारून पराभव झाल्यानंतर मेस्सीने संघ व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त करत बार्सिलोना क्लबला नोटीस धाडत क्लब सोडण्याचे संकेत दिले आहेत.
बार्सिलोना क्लबला मेस्सीने क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त करणारं एक नोटीस पाठवली आहे. परंतु, क्लबने मेस्सीला कायदेशीर लढाई लढावी लागू शकते असे संकेत दिले आहेत. तसेच क्लबकडून मेस्सीला सांगण्यात आलं आहे की, क्लब अर्जेंटिनाच्या स्टार खेळाडूला असं करण्याची परवानगी देणार नाहीत. बार्सिलोना क्लबने मेस्सीला क्लब सोडून न जाता क्लबमध्येच राहून त्याने आपली निवृत्तीची घोषणा करण्यासही सांगितलं आहे.
बार्सिलोनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, मेस्सीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये एका कलमाचा संदर्भ दिला आहे. ज्याअंतर्गत मेस्सीला या सीझनच्या शेवटी मोफत क्लब सोडण्याची परवानगी मिळते. परंतु, क्लबने मेस्सीची हा दावा फेटाळून लावत सांगतिलं की, या कलमाची अंतिम मुदत जूनमध्येच संपली आहे आणि त्यासाठी कायदेशील सल्ला घेणं गरजेचं आहे. मेस्सीच्या करारामध्ये 700 दशलक्ष युरो (826 मिलियन डॉलर) खरेदीच्या कलमाचाही समावेश आहे.
2010 सालापासून बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या मेस्सीचा संघासोबतचा करार जून 2021 पर्यंत आहे. मेसीने क्लब सोडणार असल्याचे जाहीरपणे सांगितले नसले तरी संघव्यवस्थापनाच्या निर्णयांबाबत त्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने आता यांचा काडीमोड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, क्लब आणि संघ व्यवस्थापनाबाबत मेस्सीने याआधीही नाराजी व्यक्त केली होती.
33 वर्षीय मेस्सीने बार्सिलोना क्लबकडून खेळत असताना फुटबॉल जगतातील अव्वल खेळाडू म्हणून सहा वेळा 'बॅलेन डि ऑर' पुरस्कार मिळवला आहे. तसेच क्लबला 10 स्पॅनिश लीग किताब आणि चॅपियन्स लीग जिंकवून देण्यासाठी मेस्सीचा मोलाचा वाटा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- जेम्स अँडरसनची ऐतिहासिक कामगिरी, कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज
- वाढदिवसाच्या पार्टीनंतर जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह; पार्टीला ख्रिस गेलचीही हजेरी
- सौरभ गांगुलीने ममता सरकारची जमीन परत केली, बंगाल निवडणुकीआधी भाजप प्रवेशाची अटकळ
- IPL 2020: विराट कोहली टीम RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत, कारण...