एक्स्प्लोर
IPL 2019 Final : चेन्नईच्या पराभवासोबत कर्ण शर्माचाही विक्रम हुकला!
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू कर्ण शर्माचा अनोख विक्रम होता होता राहिला. चेन्नईच्या पराभवामुळे हा विक्रम होऊ शकला नाही. मुंबईविरुद्धचा सामना चेन्नईने जिंकली असता तर सलग 4 आयपीएल जिंकण्याचा विक्रम कर्ण शर्माच्या नावावर जमा झाला असता.
मुंबई : आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादमध्ये पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर एका धावाने थरारक विजय मिळवला. पण चेन्नईच्या या पराभवासोबत अष्टपैलू कर्ण शर्माचाही विक्रम हुकला. होय, कर्ण शर्मा, आयपीएलचं विजेतेपद मिळवणाऱ्या तीन वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्त्व कर्ण शर्माने केलं आहे.
तीन संघांकडून आयपीएलचं विजेतेपद
कर्ण शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने एकूण तीन संघांकडून आयपीएलचे विजेतेपद मिळवलं आहे. अशी शानदार कामगिरी त्याच्याशिवाय कोणीही करु शकलेलं नाही.
तीन वेळा विजेतेपद जिंकल्याने त्याला आयपीएलचा सर्वात लकी खेळाडूही म्हटलं जातं. जर चेन्नई सुपर किंग्जने यंदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली असती तर कर्ण शर्माने चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद आपल्या नावावर केलं असतं.
हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईच्या विजयी संघात
चेन्नईने मुंबईविरुद्धचा सामना जिंकला असता, तर सलग चार आयपीएल विजेतेपद पटकावण्याचा विक्रम कर्ण शर्माच्या नावावर झाला असता. कर्ण शर्मा 2016 साली सनरायझर्स हैदराबाद संघात होता, 2017 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात आणि 2018 साली चेन्नईच्या संघामध्ये होता. यंदाच्या मोसमात तो चेन्नईकडून एकच सामना खेळला होता.
2016 च्या आयपीएलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी केवळ पाच सामने खेळले होते. तर 2017 मध्ये त्याला मुंबई इंडियन्ससाठी नऊ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 2018 मध्ये त्याने एकूण सहा सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. या मोसमात त्याला चेन्नई सुपर किंग्जसाठी केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. पण त्याची कामगिरी खास नव्हती. 2.5 षटकांच्या गोलंदाजीत त्याने 37 धावा दिल्या. यात त्याने एक विकेट्स घेतली.
कर्ण शर्माची आयपीएल कारकीर्द
कर्ण शर्माने आयपीएलमध्ये एकूण 62 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 26.75 ची सरासरीने आणि 7.82 च्या इकॉनामी रेटने एकूण 54 विकेट्स घेतल्या आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तो एकमेव कसोटी सामना खेळला असून त्याने चार विकेट्स घेतल्या आहेत. तर दोन वन डे आणि एका ट्वेण्टी 20 सामन्यात त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement