एक्स्प्लोर

Junior Hockey Asia Cup : पाकिस्तानचा पराभव करत भारतानं रचला इतिहास, टीम इंडिया विश्वकपसाठी पात्र

Junior Mens Asia Cup Hockey : भारतीय ज्युनियर पुरुष संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत हॉकी ज्युनियर आशिया कपवर नाव कोरलं आहे.

India vs Pakistan Hockey Final : आशियामध्ये भारतीय हॉकी (India Hockey Team) संघाचा दबदबा कायम आहे. भारतीय ज्युनियर हॉकी (Junior India Hockey) संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा पराभव करत भारताने एशिया कपवर (Junior Asia Cup Hockey) नाव कोरलं आहे. भारतीय ज्युनियर पुरुष संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाने चौथ्यांदा हॉकी ज्युनियर आशिया कप (Junior Mens Asia Cup Hockey 2023) वर नाव कोरलं आहे. ज्युनियर आशिया कप हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला. भारतीय हॉकी संघाने विजेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. हा सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे.

सर्वाधिक वेळा आशियाई विजेतेपद पटकावणारा संघ

ओमानमधील सलालाह येथे सुरू असलेल्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. ज्यूनियर हॉकी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय हॉकी संघाची लढत पाकिस्तानशी झाली. हा सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. या विजयासह ज्युनियर हॉकी भारतीय संघ सर्वाधिक वेळा आशियाई विजेतेपद पटकावणारा संघ बनला आहे. यामध्ये भारतीय संघाने 3 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानचा पराभव केला आहे.

टीम इंडिया विश्वकपसाठी पात्र

गुरुवारी, 1 जून झालेल्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 2-1 असा दणदणीत विजय मिळवला. हॉकी ज्युनियर आशिया कप जिंकणारा भारतीय संघ आता मलेशियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (FIH) पुरुष ज्युनियर विश्वचषकासाठीही पात्र ठरला आहे.

8 वर्षांनंतर ज्युनियर आशिया कपचं आयोजन

यंदा तब्बल आठ वर्षानंतर ज्युनियर आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं. 2015 मध्ये शेवटचा ज्युनियर आशिया कप खेळवण्यात आला होता, त्यावेळीही भारत विजेता होता. भारताने आतापर्यंत 2004, 2008 आणि 2015 मध्ये आशिया कप हॉकीचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता भारताने विक्रमी चौथ्यांदा ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानने 1987, 1992 आणि 1996 अशी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

संघातील प्रत्येक खेळाडूला 2-2 लाख रुपये

यासाठी हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाने संघातील भारतीय ज्युनियर हॉकी संघातील खेळाडूंना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget