Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात
Germany Win Hockey World Cup 2023 : भारतीय भूमीत पार पडलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीनं अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बेल्जियमला मात देत जेतेपद पटकावलं आहे.
GER vs BEL, Hockey WC 2023 Winner : यंदा भारतात पार पडलेल्या हॉकी विश्वचषकात (Hockey World Cup 2023) आज झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीनं बेल्जियमला मात देत विश्वचषकावर नाव (Germany Win Hockey World Cup 2023) कोरलं आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जर्मनीनं अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 च्या फरकाने मात दिली. दुसरीकडे भारतीय संघ क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धबाहेर झाला होता. पण वर्गीकरण सामन्यात (Classification Matches) भारताने चांगली कामगिरी करत 9 व्या स्थानावर स्पर्धा संपवली.
जर्मनी आणि बेल्जियम (Germany vs Belgium) या दोन्ही संघानी स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत फायनल गाठली होती. त्यामुळेच फायनलचा सामनाही अगदी अटीतटीचा झाला. भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत जर्मनीनं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. फायनलचा सामना अतिशय रोमांचक झाला, फुल टाईमपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 गोल करत सामन्यात बरोबरी साधली होती. त्यानंतर विजेता कोण? हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने बेल्जियमचा 5-4 अशा फरकाने पराभव करत आपला विजय पक्का केला आणि सोबतच विश्वचषकाची ट्रॉफी देखील उंचावली.
सामन्याचा विचार करता फ्लोरेंट याने 9व्या मिनिटाला बेल्जियमसाठी पहिला गोल केला. यानंतर 10व्या मिनिटाला कोस्यान्सने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी व्हॅलेन निकलसने जर्मनीसाठी पहिला गोल केला. त्याने 28व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीसाठी दुसरा गोल 40व्या मिनिटाला आणि तिसरा गोल 47व्या मिनिटाला झाला. त्याचवेळी बेल्जियमने अखेरच्या मिनिटांत गोल नोंदवून 3-3 अशी बरोबरी साधली. जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला गेलेला अंतिम सामना पूर्णवेळपर्यंत 3-3 असा बरोबरीत सुटला. यानंतर शूटआऊटमध्ये जर्मनीने बाजी मारली. या दोन्ही संघांनी शूटआऊटमध्येही ३-३ अशी बरोबरी साधली होती. पण जर्मनीने शानदार कामगिरी करत सामना संपवला आणि विजय मिळवला. हे त्याचे तिसरे विश्वचषक (Hockey World Cup) विजेतेपद आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा-