एक्स्प्लोर

जमैका कसोटीत यजमान उताणे, भारत मजबूत स्थितीत

मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं जमैका कसोटीच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 196 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.   जमैकाच्या सबिना पार्कवर पाहुण्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात यजमानच उताणे पडावेत अशीच काहीशी अवस्था विंडीजची झाली. या कसोटीसाठी विंडीजनं वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरावी अशी खेळपट्टी बनवून घेतली होती. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीचं आमंत्रण देणार असं सोपं समीकरण दिसत होतं. पण विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून चक्क फलंदाजी स्वीकारली आणि त्याचे परिणाम विंडीजला भोगावे लागले.   अँटिगा कसोटीप्रमाणे जमैका कसोटीतही विंडीज फलंदाज भारतीय आक्रमणासमोर टिकाव धरु शकले नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजचा अख्खा डाव अवघ्या 196 धावांत आटोपला. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं अवघ्या सात धावांतच आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून विंडीजचं कंबरडं मोडलं होतं. पण त्यानंतर मार्लन सॅम्युअल्स आणि जर्मेन ब्लॅकवूडनं चौथ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.   जर्मेन ब्लॅकवूडनं 62 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांसह 62 धावांची खेळी रचली. तर मार्लन सॅम्युअल्सनं 37 धावांची खेळी उभारली. मात्र अँटिगा कसोटीतला मॅचविनर रविचंद्रन अश्विननं दोघांचाही काटा काढून विंडीजला पुन्हा दणका दिला.   अश्विननं केवळ ब्लॅकवूड आणि सॅम्युअल्सचाच काटा काढला नाही तर 16 षटकांत 52 धावांच्या मोबदल्यात विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडलं. अश्विननं आपल्या कसोटी कारकीर्दीतल्या 34 सामन्यांमध्ये तब्बल अठरा वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.   इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनंही विंडीजच्या प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपण पार पाडल्यानंतर फलंदाजांनीही निराशा केली नाही. लोकेश राहुलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवसअखेर एक बाद 126 धावांची मजल मारली.   लोकेश राहुलनं 114 चेंडूत दहा चौकारांसह नाबाद 75 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. अँटिगा कसोटीत 84 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला मात्र आपला फॉर्म टिकवता आला नाही. धवन अवघ्या 27 धावांवर माघारी परतला. पण धवननं लोकेश राहुलच्या साथीनं 87 धावांची सलामी दिली.   आता जमैका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लोकेश राहुलला कसोटी कारकीर्दीतलं तिसरं शतक झळकावून टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवून देण्याची संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात मानाचा तुरा, वयाच्या 15 व्या वर्षी टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, BCA चा मोठा निर्णय 
वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात मानाचा तुरा, वयाच्या 15 व्या वर्षी टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, BCA चा मोठा निर्णय 
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Embed widget