एक्स्प्लोर

Women T20 Challenge: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघ जाहीर; मिताली राज, झुलन गोस्वामीला विश्रांती

भारतीय नियामक मंडळानं नुकतीच महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर सुपरनोव्हास आणि स्मृति मानधना ट्रेलब्लेझर्सच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.

Women T20 Challenge: भारतीय नियामक मंडळानं (BCCI) नुकतीच महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)  सुपरनोव्हास (Supernovas) आणि स्मृति मानधना (Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्सच्या (Trailblazers) संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, दीप्ती शर्माकडं (Deepti Sharma) व्हेलोसिटी संघाची (Velocity) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला निवड समितीनं या 3 संघांसाठी खेळाडूंची निवड केली. प्रत्येक संघासाठी 16 खेळाडू निवडले गेले आहेत. आयपीएल 2022 च्या शेवटच्या टप्प्यात महिला टी-20 चॅलेंजचं आयोजन केलं जाणार आहे. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धतील यंदाच्या हंगामाचं 23 मे ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे आयोजन केलं जाईल.

महिला टी-20 चॅलेंजमध्ये 12 परदेशी खेळाडूंचा समावेश
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत एकून चार सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा संघातील एकूण 12 परदेशी खेळाडू महिला टी-20 चॅलेंजचा भाग असतील, असं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं होतं. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स एकमेकांच्या आमने-सामने येतील. 

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचं वेळापत्रक
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील 3 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. तर, 24 मे रोजी सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. तिसरा सामना 26 मे रोजी व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. महत्वाचं म्हणजे, बीसीसीआयनं भारतीय कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांना या स्पर्धेतून विश्रांती दिली आहे.

महिला T20 चॅलेंज 2022 साठी संघ खालीलप्रमाणे-

सुपरनोव्हासचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, अलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्सचा संघ:
स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन मल्लिका, शर्मीन अख्खा, शर्मीन अख्तर एस.बी.पोखरकर.

व्हेलोसिटीचा संघ: 
दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड, माया सोनवणे, नत्थकन चांटम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्त बहादुरी, यस्तिका प्रणवी चंद्रा

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget