IPL 2023 : आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूकडून पंजाब किंग्सला चुना? सॅम करनची बॅट चालणार?
Sam Curran Poor Form in IPL : बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या पराभवानंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने सॅम करनवर निशाणा साधत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Sam Curran in IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) पराभव स्वीकारावा लागला. 20 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात (RCB vs PBKS) आरसीबीने पंजाबवर 24 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागड्या खेळाडूकडून पंजाब किंग्सला चुना लावला गेला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहे. पंजाबच्या या पराभवानंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनंही (Virendra Sehwag) सॅम करनच्या (Sam Curran) खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमासाठी झालेल्या लिलावात पंजाब किंग्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. याच कारण म्हणजे पंजाबने सॅम करनला सर्वाधिक किमतीला खरेदी केलं. आयपीएल लिलावातील सर्व जुने रेकॉर्ड मोडत पंजाब किंग्सने इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली आहे. पण आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये पंजाब किंग्सला या किंमतीचा काहीही फायदा झालेला नाही. एकाही सामन्यात सॅम करनला त्याच्या किमतीला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही.
वीरेंद्र सेहवागने सॅम करनला फटकारलं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात सॅम करनने फलंदाजी करत असताना तो वानिंदू हसरंगाकडून धावबाद झाला. सॅम करन 10 धावांवर बाद झाला. या सामन्यात सॅम करनने निष्काळजीपणा केला, ज्यामुळे तो बाद झाला. यावरून वीरेंद्र सेहवागने त्याला फटकारलं आहे. आयपीएल 2023 मधील सर्वात महागड्या खेळाडूवर सेहवागने निशाणा साधत म्हटलं आहे की, '18 कोटींमध्ये अनुभव विकत घेता येत नाही'.
'18 कोटींमध्ये अनुभव विकत घेता येत नाही'
सेहवाग पुढे म्हणाला की, सॅम करनला 18 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे, त्यामुळे तो संघाला सामना जिंकून देईल, अशी अपेक्षा आहे. पण अजूनही संघाला सॅम करनचा फायदा झालेला नाही. त्याने गरज नसताना धावा घेण्याचा प्रयत्न केला. त्याची काहीही गरज नव्हती. त्यामुळेच तो बाद झाला. तुम्ही कर्णधार आहात, तुम्हाला मैदानावर टिकण्याची गरज आहे, ज्यामुळे सामना शेवटच्या ओव्हर्सपर्यंत नेता येईल आणि संघाला फायदा होईल. पण पुन्हा एकदा सॅम करनचा कमी अनुभवीपणा पंजाब संघाला महागात पडला आहे.
पंजाब किंग्सची सॅम करनसाठी सर्वाधिक बोली
आयपीएल 2023 च्या लिलावादरम्यान सॅम करनला संघात सामील करण्यासाठी प्रत्येक संघाने बोली लावली होती. लावण्यासाठी तयार होते. सॅम करन पंजाब किंग्जकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 2019 मध्ये देखील सॅम करन पंजाब किंग्स संघाचा भाग होता. त्यावेळी पंजाबने करनला 7.20 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :