Virat Kohli : अनावश्यक तर्क काढू नका, अवनीत कौरचा फोटो कसा लाईक झाला? विराट कोहली स्पष्टीकरण देत म्हणाला...
Virat Kohli : विराट कोहलीनं अवनीत कौर या टीव्ही अभिनेत्रीच्या फॅन पेजवरील एका फोटोला लाईक केल्यानं तर्क वितर्क सुरु झाले होते. यावर विराटनं स्पष्टीकरण दिलं आहे.

बंगळुरु : टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आला होता. विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवरुन टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा फोटो लाईक केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. हा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर तर्क वितर्क सुरु झाले होते. अखेर विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवरुनच या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणाद्वारे विराट कोहलीनं चर्चा थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
विराट कोहली काय म्हणाला?
जेव्हा फीड क्लिअर करत होतो तेव्हा, अल्गोरिदम मुळं ती इंटरअॅक्शन रजिस्टर झाली असावी. यामागे कोणताही हेतू नव्हता. माझी सर्वांना विनंती आहे की अनावश्यक तर्क करु नका. तुम्ही सर्वजण समजून घ्याल, धन्यवाद असं विराट कोहली म्हणाला.
Virat Kohli's Instagram story. pic.twitter.com/xnjK3GH2T2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2025
विराट कोहलीच्या स्पष्टीकरणापूर्वी काय घडलं?
विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील फोटो लाईक केल्याचा दावा काही सोशल मीडिया यूजर्सनी केला होता. त्याचे स्क्रीन शॉट देखील व्हायरल झाले होते. यामुळं विराट कोहली संदर्भात तर्क वितर्क सुरु झाले होते. काही नेटकऱ्यांनी सुरुवातीलाच फोटो चुकून लाईक झाला असेल म्हटलं होतं. काही नेटकऱ्यांनी अवनीत कौर आता प्रसिद्ध होईल, असं म्हटलं होतं.
View this post on Instagram
आरसीबीची दमदार कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आतापर्यंत एकाही आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं नाही. विराट कोहली हा आरसीबीचा आधारस्तंभ आहे. गेल्या आयपीएलमध्ये अफलातून कामगिरी करत आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. आरसीबीनं यंदाच्या आयपीएलमध्ये रजत पाटीदार या युवा खेळाडूवर संघाचं नेतृत्त्व सोपवलं. रजत पाटीदारचं आक्रमक नेतृत्त्व आणि विराट कोहलीचा अनुभव या जोरावर आरसीबीनं या हंगामात सुरुवातीपासून दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. आरसीबीनं 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर, आरसीबीला 3 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजेच आरसीबीनं चेन्नईचा चेपॉकच्या स्टेडिमयवर पराभव देखील केला आहे.
विराट कोहलीनं 10 सामन्यात 6 अर्धशतकं झळकावली आहेत. विराटनं या हंगामात 443 धावा केल्या असून सर्वाधिक धावसंख्या 73 इतकी आहे.





















