विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर लाईक केला 23 वर्षीय टिव्ही अभिनेत्रीचा फोटो! स्क्रिन शॉट व्हायरल
Virat Kohli Viral Post : विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर लाईक केला 23 वर्षीय टिव्ही अभिनेत्रीचा फोटो! स्क्रिन शॉट व्हायरल

Virat Kohli Viral Post : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी करताना दिसतोय. दरम्यान, काल विराट कोहलीने पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) वाढदिवस दणक्यात साजरा केला. पण सध्या क्रिकेटपटू विराट कोहली वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरंतर, विराटच्या नावाचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने एका टीव्ही अभिनेत्रीचा ग्लॅमरस फोटो लाईक झाल्याचे दिसून येते.
खरंतर, सोशल मीडियावरील काही वापरकर्ते असा दावा करत आहेत की, विराट कोहलीने इंस्टाग्रामवर टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा फोटो लाईक केला आहे. जे अभिनेत्रीच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आले आहे. त्याचे काही स्क्रीनशॉट ऑनलाइन व्हायरलही होत आहेत. ज्यामध्ये विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटने एका टिव्ही अभिनेत्रीचा फोटो लाईक केल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
ही पोस्ट व्हायरल होताच, युजर्सनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, '. ते चुकून घडले असेल. दुसऱ्याने लिहिले, "कदाचित त्याच्या मॅनेजरला ते आवडले असेल." तिसऱ्याने लिहिले, 'आता ही मुलगी प्रसिद्ध होईल.' एकाने तर म्हटले, 'ही अवनीतची कामगिरी आहे.'
विराटकडून पत्नी अनुष्काचा वाढदिवस दणक्यात साजरा
दरम्यान, विराट कोहलीला ते खरोखर आवडले आहे याचा अद्याप कोणताही पुरावा नाही. अभिनेत्रीच्या फॅन पेजवरून असा दावा केला जात आहे. काल विराटने त्याची पत्नी अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले, "तू आमच्या सर्वांच्या आयुष्याची मार्गदर्शक आहेस. आम्ही तुला दररोज अधिक प्रेम करतो. We love you so much more everyday वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह.."
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
चित्रा वाघ यांच्यानंतर आता रुपाली चाकणकर आक्रमक, उल्लू ॲपवरील अश्लिल 'हाऊस अरेस्ट'वर बंदीची मागणी!























