CSK IPL 2025 Fair Play Award : चॅम्पियन आरसीबी ठरली, पण चर्चा सीएसकेची झाली; फायनलमध्ये न पोहचताही चेन्नईने ट्रॉफी जिंकली, IPL कडून मोठा सन्मान
Virat Kohli and RCB are finally IPL champions : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत 18 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आणि पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

Chennai Super Kings Win IPL 2025 Fair Play Award : आयपीएलच्या (IPL 2025) थरारक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत 18 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आणि पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत अनेक खेळाडू आले आणि गेले. पण याच विराट कोहलीला आणि आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र लागला 18 वर्षांचा काळ.
Tears. Roars. Jubilation 🥹
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
The emotions of #RCB were raw, real, and 1⃣8⃣ years in the making ❤️#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/fXVTbfCZFp
अहमदाबादच्या स्टेडियमवर आरसीबीनं पंजाबला हरवून अंतिम सामना जिंकला तेव्हा विराटच्याही अश्रूंचा बांध फुटला. एकीकडे आरसीबीचा हा ऐतिहासिक विजय साजरा होत असतानाच, दुसरीकडे एक ट्रॉफी मात्र चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) नावावर गेली.
होय, आयपीएल 2025 चा फेअर प्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग्सने जिंकला आहे. संघाने अंतिम फेरी गाठली नाही, तरीही मैदानावरील शिस्त आणि प्रामाणिक खेळ याबाबतीत चेन्नईने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्सला या सन्मानासोबत आयपीएलकडून 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देखील प्रदान करण्यात आली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने नेहमीच आदर्श खेळाची पातळी जपली आहे. प्लेऑफमध्ये स्थान न मिळवता देखील त्यांनी मैदानावरील आचारसंहिता, इतर संघांविषयी आदर आणि वेळेचं काटेकोर पालन यामुळे हा पुरस्कार पटकावला.
तर एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्रॉफी जिंकून इतिहास रचला, तिकडे चेन्नई सुपर किंग्सने आपल्या शिस्तबद्धतेतून क्रिकेटचा आत्मा जपण्याची परंपरा कायम ठेवली. आयपीएल 2025 च्या या दुहेरी जल्लोषात, क्रिकेट प्रेमींच्या मनात आरसीबी विजेते ठरली, पण चेन्नईचं नावही पुन्हा एकदा आदराने घेतलं गेलं.
All is Fair in Yellove! 💛🦁
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 3, 2025
For the 7th time! 🙌#AllYouNeedIsYellove pic.twitter.com/cNn5YiKWHe
आयपीएल 2025 च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी
विजेता संघ - आरसीबी 20 कोटी
उपविजेता - पंजाब किंग्ज संघ 12.5 कोटी
तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन् 7 कोटी
चौथ्या स्थानी राहिलेला संघ – गुजरात टायटन्स 6 कोटी
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा 1 लाख
अंतिम फेरीतील सामनावीर - कृणाल पांड्या 5 लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट्स) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, 759 धावा) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
फँटसी किंग ऑफ द सीझन - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर(एमव्हीपी) - सूर्यकुमार यादव 15 लाख रुपये आणि ट्रॉफी
फेअरप्ले पुरस्कार - चेन्नई सुपर किंग्ज 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्स ऑफ द सीझन - निकोलस पूरन (40 षटकार) १० लाख
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन - मोहम्मद सिराज 10 लाख
कॅच ऑफ द सीझन - कामिंदू मेंडिस 10 लाख
सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - 10 लाख
फोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) 10 लाख
खेळपट्टी आणि मैदान - दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड 50 लाख





















