(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video: चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत जोस बटलरचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
आयपीएलमध्ये 14 वर्षांनंतर अंतिम सामना खेळणाऱ्या राजस्थानचं विजेतेपद निश्चितच हुकलं. परंतु, राजस्थानच्या संघातील सलामीवीर जोस बटलर आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांनी उत्कष्ट प्रदर्शन करून दाखवलं.
Viral Video: आयपीएलमध्ये 14 वर्षांनंतर अंतिम सामना खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचं विजेतेपद निश्चितच हुकलं. परंतु, राजस्थानच्या संघातील सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनी उत्कष्ट प्रदर्शन करून दाखवलं. सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी सपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. या हंगामात जोस बटलरनं सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. तर, युजवेंद्र चहलनं या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप काबीज केली. दरम्यान, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानं (Dhanashree Verma) या दोघांसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा जोस बटलर आणि पती चहलच्या समोर उभी राहून डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तिच्या मागं उभा राहून दोघंही डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसत आहे. परंतु, चहलला डान्स स्टेप्स करता आल्या नाहीत आणि तो एका बाजूला उभा राहून धनश्री आणि जोस बटलरचा डान्स पाहू लागला. चहलची मजेदार प्रतिक्रिया पाहून संघातील इतर सदस्य खूप हसतात. डान्सच्या शेवटी, जोस बटलर युजवेंद्र चहलची आयकॉनिक स्टेप देखील करतो. ज्यावर सोशल मीडियावर खूप मीम्स तयार केले जातात.या मजेशीर व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
राजस्थान रॉयल्सचं यंदाच्या हंगामातील कामगिरी
राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलचा पंधरावा हंगामात चांगला ठरला. या हंगामात राजस्थान रॉयल्स दमदार खेळ दाखवला. हंगामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत राजस्थानचा टॉप-3 मध्ये समावेश होता. राजस्थाननं लीग टप्प्यातील 14 पैकी 9 सामने जिंकून क्वालिफायर-1 मध्ये प्रवेश केला. येथे गुजरातकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थाननं क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या आरसीबीचा पराभव केला. परंतु, अंतिम सामन्यात राजस्थानला गुजरातकडून सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
व्हिडिओ-
- IPL चॅम्पियनलाला 20 कोटी, जगभरातील इतर टी 20 लीगमध्ये विजेत्याला किती रक्कम?
- Gujarat Titans Felicitated: गुजरातचे मुख्यमंत्री आयपीएल विजेत्या संघाला भेटले, कर्णधाराला दिली खास भेटवस्तू
- IPL 2022 : आयपीएलसाठी काम करणाऱ्या ग्राऊंड्समनला 25 लाखांचे बक्षीस, बीसीसीआयचा मोठा निर्णय