IPL चॅम्पियनलाला 20 कोटी, जगभरातील इतर टी 20 लीगमध्ये विजेत्याला किती रक्कम?
IPL 2022 : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) 7 विकेट्सनी मात देत विजयश्री मिळवला आहे.
IPL 2022 : आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामाची अखेर सांगता झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) 7 विकेट्सनी मात देत विजयश्री मिळवला आहे. दरम्यान आयपीएलचा खिताब जिंकल्याबद्दल विजेत्या गुजरात संघाला तब्बल 20 कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं आहे. तर उपविजेत्या राजस्थान संघाला 13 कोटींची रक्कम मिळाली आहे. सीव्हीसी कॅपिटल्सने गुजरात फ्रेंचाइजीला 5625 कोटी रुपयात खरेदी केले होतं, ज्यानंतर पदार्पणाच्या हंगामातच गुजरातने विजय मिळवत कमाल कामगिरी केली आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबी संघाला 7 कोटीं रुपये तर लखनौ संघाला 6.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. ही रक्कम जगभरातील इतर टी 20 लीग पेक्षा जवळपास तीनपट आहे. पाहूयात जगातील कोणकोणत्या लीगमध्ये विजेत्याला किती रक्कम दिली जाते...
आयपीएलनंतर विजयाची सर्वाधिक रक्कम कॅरेबिअन प्रिमिअर लीगमध्ये मिळते. CPL मध्ये चॅम्पियन संघाला 7.5 कोटी रुपयांची रक्कम मिळते.. त्याशिवाय बांग्लादेश प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघाला 6.34 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाते. तर पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच PSL जिंकणाऱ्या संघाला 3.73 कोटी रुपयांचं बक्षीस दिले जाते. ही रक्कम आयपीएलमधील विजेत्या संघाला मिळणाऱ्या रक्कम पेक्षा खूप कमी आहे.
लीग विजेत्याला मिळणारे बक्षीस
आयपीएल 20 कोटी
कॅरेबियन प्रीमियर लीग 7.5 कोटी
बांग्लादेश प्रीमियर लीग 6.34 कोटी
पाकिस्तान सुपर लीग 3.73 कोटी
बिग बॅश लीग 3.35 कोटी
द हंड्रेड लीग 1.51 कोटी
लंका प्रीमियर लीग 73.7 लाख
आयपीएल सुरु झाल्यापासून विजेत्या संघाला किती रक्कम दिली गेली?
IPL 2008 – 4.8 कोटी
IPL 2009 – 6 कोटी
IPL 2010 – 8 कोटी
IPL 2011 – 10 कोटी
IPL 2012 – 10 कोटी
IPL 2013 – 10 कोटी
IPL 2014 – 15 कोटी
IPL 2015 – 15 कोटी
IPL 2016 – 20 कोटी
IPL 2017 – 15 कोटी
IPL 2018 – 20 कोटी
IPL 2019 – 20 कोटी
IPL 2020 – 10 कोटी
IPL 2021 – 20 कोटी
IPL 2022 – 20 कोटी