![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
UP-W Vs RCB-W WPL 2023 Live Streaming: यूपी वॉरियर्स विरुद्ध आरसीबी; दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती; सामना कधी, कुठे पाहाल?
UP vs RCB: वुमेन्स प्रीमियर लीग 2023 मध्ये आज यूपी वॉरियर्स आणि आरसीबी यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. दोघांसमोरही करो या मरोची परिस्थिती आहे.
![UP-W Vs RCB-W WPL 2023 Live Streaming: यूपी वॉरियर्स विरुद्ध आरसीबी; दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती; सामना कधी, कुठे पाहाल? up w vs rcb w wpl 2023 live streaming where to watch up warriorz vs royal challengers bangalore womens ipl live telecast UP-W Vs RCB-W WPL 2023 Live Streaming: यूपी वॉरियर्स विरुद्ध आरसीबी; दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती; सामना कधी, कुठे पाहाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/6f102eeaa98141dc060a6468f1c125251678850689568366_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UP Warriorz vs Royal Challengers Bangalore: महिला प्रीमियर लीग 2023 (Women's Premier League 2023) चा तेरावा सामना आज, 15 मार्च रोजी यूपी वॉरियर्स (UP Warriorz) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यात आरसीबी संघाला पहिला विजय नोंदवायचा आहे. स्मृती मानधनाचा संघ महिला WPL 2023 मध्ये सलग 5 सामने हरला आहे. त्यामुळे त्याच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सची कामगिरी थोडी चांगली झाली आहे. अॅलिसा हिलीच्या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आहेत आणि 2 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. 15 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात आरसीबीचा संघ पराभूत झाला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या महिला संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. पण कसं? जाणून घेऊया सविस्तर...
केव्हा खेळवला जाईल यूपी वॉरियर्स-रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्यातील सामना?
15 मार्च रोजी यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या महिला संघांमध्ये सामना होणार आहे.
यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघ सामना कुठे होणार?
यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या महिला संघांमधील सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार यूपी वॉरियर्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधील सामना?
यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच, 7 वाजता नाणेफेक होईल.
यूपी वॉरियर्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोणत्या चॅनलवर पाहता येणार?
यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय जिओ सिनेमा अॅपचे सब्सक्रिप्शन घेतलेले युजर्स ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे थेट त्यांच्या मोबाईल फोनवर सामन्याचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स https://www.abplive.com/ वरही उपलब्ध असतील.
यूपी वॉरियर्स- रॉयल चॅलेंजर बंगळुरु सामन्यासाठी महिला संघ
यूपी वॉरियर्सचा संघ : अलिसा हिली (कर्णधार), अंजली सरवानी, लॉरेन बेल, पार्श्वी चोप्रा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस हॅरिस, शबनीम इस्माईल, ताहलिया मॅकग्रा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, शिवाली शर्मा, सिमरन शेख. देविका वैद्य, सोप्पधंडी यशश्री.
रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), कनिका आहूजा, शोभना आशा, एरिन बर्न्स, सोफी डिवाइन, ऋचा घोष, दिशा कासत, पूनम खेमनार, हीथर नाईट, श्रेयंका पाटिल, सहाना पवार, एसिल पैरी, प्रीती बोस रेणुका सिंह, इंद्राणी रॉय, मेगन शूट, डेन वान नाइकर्क, कोमल जंजाड.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)