(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRH in IPL : नो बॉल होता की नाही ? हैद्राबाद-लखनौ सामन्यात वाद, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली नाराजी
SRH in IPL : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी याने हैद्राबाद आणि लखनऊच्या सामन्यांत पंचांनी दिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याने ट्विट करत ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
SRH in IPL : निकोलस पूरनच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर लखनौच्या नवाबांनी हैदराबादचा पराभव केला. पण हा सामना पंचांनी दिलेल्या एका निर्णायामुळे वादात सापडलाय. तिसऱ्या पंचांनी आवेश खान याने फेकलेल्या एका चेंडूवर वाद निर्माण झाला होता. आवेश खान याने फेकलेला चेंडू मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला होता. लखनौच्या संघाने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली.. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी हा निर्णय चुकीचे असल्याचे सांगत मैदानावरील पंचाचा निर्णय बदलला.. त्यानंतर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केली. टॉम मूडी आणि मिचेल मॅघलेगन यांनाही ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू टाकला, ज्याला पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने पंचांच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. चेंडूचा आढावा घेतला, त्यामध्ये आवेश खानचा चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होते, कारण चेंडू स्टम्पपेक्षा जस्त उंचीने जात होता. परंतु थर्ड अंपायरने मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला आणि नो बॉल नसल्याचे म्हटले. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडीने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
"पंच चुकीच्या निर्णयासाठी एवढा वेळ घेतात का?"
टॉम मूडी यांनी ट्विट करत म्हटले की, 'चुकीच्या निर्णयासाठी पंच इतका वेळ कसा घेऊ शकतात?' पंचांनी नो बॉल न देण्याच्या निर्णयाने टॉम मूड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टॉम मूडी व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅकक्लेनघननेही ट्विट केले आहे. मिशेल मॅकक्लेनघननेही टॉम मूडी यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. मिशेल मॅकक्लेनघन यांने ट्विट करत म्हटले आहे की, 'पंचांचा नो बॉल न देण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.'
Yet again Third Umpire said it's Not a No-Ball
— Pandu Raj (@CSKianPanduRaj) May 13, 2023
What is a No-Ball According to them??#SRHvLSG #LSGvSRH pic.twitter.com/8AHWFfKbTA
How can the 3rd umpire take that long to make the wrong decision? #noball #SRHvLSG
— Tom Moody (@TomMoodyCricket) May 13, 2023
How was that No Ball over turned? #SRHvLSG
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) May 13, 2023
IPL 2023, SRH vs LSG : मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन याने वादळी फलंदाजी करत लखनौला विजय मिळवून दिला. हैदराबादला घरच्या मैदानावर सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या नवाबांनी दिलेले १८३ धावांचे आव्हान लखनौच्या नवाबांनी सात विकेट राखून सहज पार केले. लखनौकडून प्रेरक मंकड याने संयमी अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पूरन याने झंझावाती फलंदाजी केली. या विजयासह लखनौने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौ संघ प्लेऑफच्या दिशेन आगेकूच करत आहे. तर दुसरीकडे हैदराबादचे प्लेऑफमधील आव्हान खडतर झालेय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
SRH vs LSG, Match Highlights: पूरनच्या फटकेबाजीपुढे हैदराबादचे नवाब फस्त, लखनौचा 7 विकेटने विजय