एक्स्प्लोर

SRH vs LSG, Match Highlights: पूरनच्या फटकेबाजीपुढे हैदराबादचे नवाब फस्त, लखनौचा 7 विकेटने विजय

IPL 2023, SRH vs LSG: या विजयासह लखनौ संघाने प्लेऑफच्या दिशेन आगेकूच करत आहे. तर दुसरीकडे हैदराबादचे प्लेऑफमधील आव्हान खडतर झालेय. 

IPL 2023, SRH vs LSG : मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन याने वादळी फलंदाजी करत लखनौला विजय मिळवून दिला.  हैदराबादला घरच्या मैदानावर सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या नवाबांनी दिलेले १८३ धावांचे आव्हान लखनौच्या नवाबांनी सात विकेट राखून सहज पार केले. लखनौकडून प्रेरक मंकड याने संयमी अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पूरन याने झंझावाती फलंदाजी केली. या विजयासह लखनौने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौ संघ प्लेऑफच्या दिशेन आगेकूच करत आहे. तर दुसरीकडे हैदराबादचे प्लेऑफमधील आव्हान खडतर झालेय. 

१८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात निराशाजनक झाली होती. काइल मेयर्स झटपट बाद झाला. मेयर्स याला १४ चेंडूत फक्त दोन धावा काढता आल्या. त्यानंतर क्विंटन डि कॉक आणि प्रेरक मंकड यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. पण क्विंटन डि कॉक २९ धावांवर बाद झालाय. डिकॉक याने १९ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने २९ धावांचे योगदान दिले. डिकॉक बाद झाल्यानंतर प्रेरक आणि स्टॉयनिस यांनी लखनौच्या डावाचा पाया रचला.

प्रेरक मंकड याने संयमी फलंदाजी करत एक बाजू सांभाळली. दुसऱ्या बाजूला स्टॉयनिस याने पहिल्यांदा फटकेबाजी केली. स्टॉयनिस याने २५ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षषटकार आणि दोन चौकार लगावले. तर निकोलस पूरन याने नाबाद ४४ धावांची खेळी करत विजाचा कळस लावला. निकोलस पूरन याने अवघ्या १३ चेंडूतचार षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने ४४ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्माच्या एका षटकात तब्बल ३१ धावा काढल्या. स्टॉयनिस याने आधी दोन षटकार लगावले.. तिसऱ्या चेंडूवर स्टॉयनिस बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन याने लागोपाठ तीन षटकार लगावले. याच षटकात सामना लखनौच्या बाजूने फिरला. प्रेरक मंकड याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मंकड याने ४५ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. प्रेरक मंकड याने डिकॉकसोबत ३० चेंडूत ४२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर स्टॉयनिससोबत तिसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ७३ धावांची भागिदारी केली. तर निकोलस पूरन याच्यासोबत२३ चेंडूत ५८ धावांची भागिदारी केली.


हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. मयंक मार्कंडेय, अभिषेक शर्मा आणि ग्लेन फिलिप यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांची पाटी रिकामीच राहिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 News : टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
IPL : भारतापुढं टी 20 वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाचा प्रश्न,  IPL च्या वेळापत्रकावर BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर 
भारतापुढं टी 20 वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाचा प्रश्न,  IPL च्या वेळापत्रकावर BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर 
RCB IPL 2026 : सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
Sarfaraz Khan News : आधी नाकारलं, पण नंतर सरफराज खानला चेन्नईने स्वस्तात उचललं; संधी मिळताच भावूक पोस्ट, व्हिडीओने थेट केलं काळजाचं पाणी पाणी
आधी नाकारलं, पण नंतर सरफराज खानला चेन्नईने स्वस्तात उचललं; संधी मिळताच भावूक पोस्ट, व्हिडीओने थेट केलं काळजाचं पाणी पाणी

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget