एक्स्प्लोर

IPL मध्ये पहिल्यांदाच झाले...चेन्नईच्या एकाही फलंदाजाला 400 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही

 CSK IPL : न्नईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चार वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा दहावा पराभव होता.

 CSK IPL : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा अखेरचा साखळी सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना फक्त  150 धावा केल्या. यामध्ये मोईन अलीने 93 धावांची खेळी केली होती तर धोनीने  26 धावा जोडल्या होत्या. चेन्नईने दिलेले आव्हान राजस्थानने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या पराभवासह यंदाच्या हंगामातील चेन्नईचा प्रवास संपला. चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. चेन्नईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चार वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा दहावा पराभव होता.  

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईला चौदा सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले आहेत. आठ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ संघर्ष करताना दिसला... गोलंदाज आणि फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या प्रत्येक हंगामावर नजर मारल्यास चेन्नईची यंदाची सर्वात निराशाजनक कामगिरी होय... चेन्नईच्या एकाही फलंदाजाला 400 धावा काढता आल्या नाहीत. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक हंगामात चेन्नईच्या फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा चोपल्या होत्या. आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच झालेय, चेन्नईच्या फलंदाजांना एका हंगामात चारशेही धावा काढता आल्या नाहीत. 

ऋतुराज टॉप स्कोरर - 
यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक धावा ऋतुराज गायकवाडने केल्या आहेत. ऋतुराजने 14 सामन्यात 368 धावा चोपल्या आहेत. यंदाच्या हंगामातील त्याची सर्वोत्कृष्ट खेळी 99 धावांची आहे. त्याशिवाय शिवम दुबेने 11 सामन्यात 289 धावा, अंबाती रायुडूने 13 सामन्यात 274 धावा, डेवोन कॉनवेने 7 सामन्यात 252 रन, मोईन अलीने दहा सामन्यात 244 धावा, एमएस धोनीने 14 सामन्यात 232 धावा, रॉबिन उथप्पाने 12 सामन्यात 230 धावा केल्या आहेत. सीएसकेच्या एकाही फलंदाला चारशेपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.  

सीएसकेसाठी एका हंगामात चारशे पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज

 2008 - सुरेश रैना , एमएस धोनी
2009 - सुरेश रैना , मॅथ्यू हेडन, 
2010 - सुरेश रैना , मुरली विजय
2011 - सुरेश रैना, मुरली विजय, मायकल हसी
2012- सुरेश रैना
 2013 -सुरेश रैना, एमएस धोनी , मायकल हसी
2014 -सुरेश रैना, ड्वैन स्मिथ, ब्रेंडन मॅकुलम
2015- ब्रेंडन मॅकुलम
2018 -सुरेश रैना, एमएस धोनी, शेन वॉटसन, अंबाती रायुडू
2019 -एमएस धोनी
2020 -फाफ डु प्लेसिस 
2021 - फाफ डु प्लेसिस , ऋतुराज गायकवाड  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
Sangli Loksabha : संजय राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंत पाटील म्हणतात, 'सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा...'
राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंतराव म्हणतात, सर्वांचा रोख माझ्यावर, पण..
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP MajhaChandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?Mahesh Kharade : महेश खराडे यांनी घोड्यावर स्वार होत भरला उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
Sangli Loksabha : संजय राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंत पाटील म्हणतात, 'सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा...'
राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंतराव म्हणतात, सर्वांचा रोख माझ्यावर, पण..
Hemant Godse on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP Majha
Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP Majha
Embed widget