Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव ट्रोल, रियान परागबाबत ट्विट करणं पडलं महागात!
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सनं सात विकेट्स राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सनं सात विकेट्स राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या डेव्हिड मिलरनं 68 झंझावती खेळी करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याचबरोबर सामन्यादरम्यान रियान परागचा (Riyan Parag) अॅटीट्यूड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. गुजरात विरुद्धच्या सामन्यात जेव्हा रियान पराग अश्विनमुळं धावबाद झाला तेव्हा तो आपल्या वरिष्ठ खेळाडूवर चिडताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याच्या वर्तणुकीचा निषेध केला.
इतकंच नाही तर सामन्यादरम्यान गुजरातच्या डावातील 16व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मिलरने बाऊंड्री लाईनवर सर्वोत्तम शॉट मारत चेंडू रोखण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण त्याचवेळी तो त्याच्या सहकारी खेळाडूवर रागावतानाही दिसला. ज्यामुळं सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. पण भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवनं ट्विट करून त्याच्या अशा वृत्तीचे कौतुक केले आहे. ज्यानंतर नेटकऱ्यांनी सुर्यकुमार यादवलाही ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
सूर्यकुमारच्या या ट्विटवर परागनेही प्रतिक्रिया दिली आणि कमेंट करताना टाळ्या वाजवणारा इमोजी शेअर केला. पण दुसरीकडे चाहते सूर्यकुमार यादवला सल्ला देत आहेत की, तरुण खेळाडूच्या अशा वृत्तीबद्दल तुम्ही त्याचं कौतुक करू नका.
गुजरातविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानच्या संघाला सात विकेट्सन पराभव स्वीकारावा लागला. परंतु, राजस्थानला एक संधी मिळणार आहे. एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाशी राजस्थानचा सामना होणार आहे. क्वालिफायर 2 मध्ये जिंकणारा संघ गुजरातशी अंतिम सामना खेळेल.
हे देखील वाचा-