IPL 2022 : एलिमिनेटर सामन्यात पावसाचा व्यत्यय, लखनौ-आरसीबीचं काय होणार?
LSG vs RCB IPL 2022 Live Updates, Eliminator : आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात पावासाचा व्यत्यय आला आहे.
LSG vs RCB IPL 2022 Live Updates, Eliminator : आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात पावासाचा व्यत्यय आला आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे. ईडन गार्डन खेळपट्टीवर कव्हर टाकण्यात आले आहेत. पावासाच्या व्यत्ययामुळे सामना उशारा होणार आहे. पाऊस पडल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. पहिल्या क्वालिफायरआधीही कोलकात्यात पावसाने हजेरी लावली होती. पण सामन्यावेळी पावासाने विश्रांती घेतली होती.
आरसीबीला फटका -
एलिमिनेटर सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केलाय. पावासाचा सर्वाधिक फटका फाफच्या आरसीबीला बसणार आहे. पावसामुळे सामना न झाल्यास लखनौ संघाला क्वालिफायरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एलिमिनेटर अथवा फायनलसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच प्लेऑफमधील सामन्यादरम्यान पाऊस आल्यास गुणतालिकेतील अव्वल संघ पुढील फेरीस पात्र ठरतो.. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या आणि आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे सामना न झाल्यास आरसीबीचा पत्ता कट होणार आहे.
𝗘𝘅𝗽𝗹𝗮𝗶𝗻𝗲𝗱!
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
Playing Conditions for the #TATAIPL 2022 Playoffs 🔽
*⃣ All Timings In IST pic.twitter.com/eelQXPHJ2b
IPL - पाऊस लवकर थांबला नाही तर काय होणार?
९.४० ला खेळ सुरु झाला तर एकही षटक कमी होणार नाही, सामना पूर्ण २०-२० षटकांचा होणार,
१२ वाजता खेळ सुरु झाला तर सामना पाच पाच षटकांचा होणार.
पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर होणार.
सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकली नाही तर लखनौ विजयी घोषित करणार आणि आरआर सोबत त्यांचा सामना होणार
🚨 Update from the Eden Gardens 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
It has started to rain 🌧️ in Kolkata and the toss is delayed!
Follow the match ▶️ https://t.co/cOuFDWIUmk #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/W7dlpdeogK
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे. 'करो या मरो'च्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. पराभूत संघआचे आव्हान संपुष्टात येणार आहे.. तर विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानसोबत भिडणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कोलकात्यामुळे दोन दिवसांपासून पाऊस पडत होता.. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे... नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
लखनौची दमदार कामगिरी
लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम खेळत आहे. या हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने 14 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे.
आरसीबीचा मधील प्रवास
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते 2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते.