LSG vs RCB: लखनौ- बंगळुरू सामन्यासाठी मांजरेकरांनी निवडली प्लेईंग इलेव्हन, कोणकोणत्या खेळाडूला दिली संघात जागा?
LSG vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत.
LSG vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. लखनौ- बंगळुरू सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरनं त्यांची प्लेईंग इलेव्हन निवडली आहे.
मांजरेकरने ईएसपीएनक्रिकइन्फोवर त्यांची प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. ज्यामध्ये त्याने ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार बनवलं आहे. "मॅक्सवेल हा एक प्रभावशाली खेळाडू आहे आणि तो बॅट आणि बॉल दोन्हीने चमत्कार करू शकतो. गेल्या सामन्यातही तो सामनावीर ठरला होता". तर, केएल राहुलची संजय मांजरेकर यांनी या फॅन्टसी इलेव्हनचा उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. राहुल एलएसजीचा कर्णधार आहे. राहुलसाठी मांजरेकर म्हणाले की, तो ज्या प्रकारे मोठी धावसंख्या करतो, त्यामुळेच त्याला उपकर्णधारपदी ठेवण्यात आलं आहे.
पुढे मांजरेकर म्हणाले की, विराट कोहली गेल्या सामन्यात फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळं त्याला तिसऱ्या क्रमांकावर निवडलं आहे. त्यानंतर या संघात दीपक हुडा, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, मोहसीन खान, आवेश खान, जोश हेझलवूड, मार्कस स्टॉइनिस, वाहिंदू हसरंगाची निवड करण्यात आली.
संजय मांजरेकरांची प्लेईंग इलेव्हन:
ग्लेन मॅक्सवेल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, मोहसीन खान, आवेश खान, जोश हेझलवूड, मार्कस स्टॉइनिस, वाहिंदू हसरंगा.
हे देखील वाचा-