IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, हुकमी एक्का पहिल्या दोन सामन्याला मुकणार
Mumbai Indians, IPL 2024, Suryakumar Yadav Health Update : आयपीएल 2024 सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
Mumbai Indians, IPL 2024, Suryakumar Yadav Health Update : आयपीएल 2024 सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या दोन सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. रोहित शर्मानंतर आता सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुंबईपुढील अडचणी वाढल्या आहेत. सूर्यकुमार यादव सध्या एनसीएमध्ये तंदुरुस्तीवर काम करत आहे.
भारताचा स्टार टी 20 फलंदाज सूर्यकुमार यादव हा बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. नुकतीच त्याच्या घोट्यावर सर्जरी झाली होती. तो आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. याआधी रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याच्या चर्चा होत्या. धर्मशालामध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण मुंबईसाठी लागोपाठ दोन धक्के बसले आहेत.
मुंबईला तगडा झटका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सामन्यासाठी उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहेत. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल रनसंग्रामाला 24 मार्चपासून सुरुवात करणार आहे. त्यांच पहिला सामना गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. तर आयपीएलच्या रनसंग्रामाल 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 24 मार्च रोजी सूर्यकुमार यादव आयपीएलसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
सूर्या कधी कमबॅक करणार ?
पीटीआयला बीसीसीआयमधील सुत्राने सांगितलं की, "सूर्यकुमार यादव याच्या फिटनेसमध्ये सुधार आहे. तो निश्चितपणे आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात कमबॅक करेल. पण एनसीएमधील स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिकल टीम हार्दिक पांड्याला कधी फिटनेस प्रमाणपत्र देतेय. गुजरात आणि हैदराबाद यांच्याविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी हार्िदक पांड्या उपलब्ध नसेल. पण पुढील सामने खेळण्यासाठी बीसीसीयकडून परवानगी दिली जाऊ शकते.
🚨Mumbai Indians' batter, Suryakumar Yadav, is facing the possibility of missing the initial two matches of the upcoming Indian Premier League (IPL) 2024 season as the swashbuckling batter continues rehabilitation in NCA. #SuryakumarYadav #IPL2024 #MumbaiIndians pic.twitter.com/t2ZIE9kqsy
— RevSportz (@RevSportz) March 12, 2024
मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यासाठी अद्याप 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. सूर्यकुमार यादव याला तंदुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी शिल्लक आहे, असे पीटीआयला सूत्रांनी सांगितलं. सूर्यकुमार यादव मुंबईसाठी महत्वाचा फलंदाज आहे. त्यानं 60 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात चार शतके ठोकली आहेत. त्याने 171 च्या स्ट्राईक रेटने 2141 धावा चोपल्या आहेत. जूनमध्ये भारतीय संघ टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाईल. हे विजेतेपद सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीवर बरेच अवलंबून असेल. सूर्यकुमार यादव याची विस्फोटक खेळी भारताची जमेची बाजू असेल.