Stephen Fleming on MS Dhoni IPL 2025 : 10 ओव्हर सोडा, धोनी धावणंही कठीण, गुडघे झिजले, शरीर थकलं, स्टीफन फ्लेमिंगने धोनीबदद्ल सगळंच सांगितलं!
आयपीएल 2025 मध्ये आरसीबी विरुद्धच्या सामन्यात जेव्हा एमएस धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा सोशल मीडियापासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांनी माहीवर टीका केली.

Stephen Fleming on MS Dhoni IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये आरसीबी विरुद्धच्या सामन्यात जेव्हा एमएस धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा सोशल मीडियापासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांनी माहीवर टीका केली. यानंतर, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी सहाव्या क्रमांकावर खेळायला आला असला तरी, त्याच्या बॅटमध्ये आणि त्याच्या खेळात पूर्वीसारखी चमक दिसून आली नाही.
चेन्नई संघाने या हंगामात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त एकच जिंकला आहे. त्याला दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. या तीनही सामन्यांमध्ये धोनीने 46 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी नाबाद 30 धावा होती. या सगळ्यामध्ये, चाहते हे जाणून घेण्यास उत्सुक असतील की धोनी इतक्या खालच्या पातळीवर फलंदाजी का करत आहे?
The situation 🤯
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
The catch 🫡
The moment 🔝
🎥 Shimron Hetmyer's match-changing catch 🙇♂️
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK | @rajasthanroyals pic.twitter.com/ytuCdERVas
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनीच्या बचावात धाव घेतली. फ्लेमिंगने सीएसकेचा यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनीचा बचाव करताना म्हटले की, त्याला आता 10 षटके फलंदाजी करणे कठीण होत आहे. म्हणूनच तो वरच्या क्रमात फलंदाजी करायला येत नाही.
चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग काय म्हणाले?
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 6 धावांनी पराभवानंतर सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, "ही काळाची बाब आहे. धोनी सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे. त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. हेच कारण आहे की धोनीला 10 षटकं फलंदाजी करणं कठीण आहे. म्हणूनच धोनी परिस्थितीचे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार फलंदाजी करतो.
धोनीचे वय किती आहे?
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनी 43 वर्षांचा झाला आहे. साधारणपणे, तो चेन्नईसाठी फक्त तेव्हाच क्रीजवर येतो जेव्हा खेळात खूप कमी चेंडू शिल्लक असतात. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन म्हणाले की, त्याचं शरीर आणि गुडघा आता पूर्वीसारखे राहिलेलं नाही. तो व्यवस्थित चालत आहे, पण त्याला व्यवस्थित ठेवणं हा देखील एक पैलू आहे. संघ 13 व्या आणि 14 व्या षटकानंतर धोनीला फलंदाजी करण्यास सांगतो, परंतु तो सामन्याच्या परिस्थितीनुसारच फलंदाजीला येतो.
स्टीफन फ्लेमिंग पुढे म्हणाले की, मी गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे, धोनी आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक लीडर आहे आणि यष्टिरक्षक म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे.





















