सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ, पश्चिम बंगाल सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा
Former Indian cricket captain Sourav Ganguly's security :
Former Indian cricket captain Sourav Ganguly's security : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून सौरव गांगुली याला झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या सुरक्षा अधिकाऱ्यांने याबाबतची माहिती दिली. सौरव गांगुली याला याआधी वाय श्रेणीची सुरक्षा मिळत होती. त्यामध्ये वाढ करुन आता झेड सुरक्षा दिली जाणार आहे.
माजी कर्णधार सौरव गांगुली याला आधी राज्य सरकारकडून Y श्रेणीची सुरक्षा मिळत होती. कोलकाता पोलिसांच्या विशेष शाखेतील 3 आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे 3 असे एकूण 6 पोलीस कर्मचारी सौरव गांगुलीच्या घराबाहेर सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. आता झेड सुरक्षा झाल्यामुळे ती संख्या 6 वरून 8 ते दहा पर्यंत वाढवली जाईल. झेड श्रेणीत आता कडक सुरक्षा मिळेल.
सौरभ गंगुलीच्या सुरक्षेत अचानक वाढ का करण्यात आली ? असा प्रश्न उपस्थित झाला. राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआयपीला Y श्रेणीची सुरक्षा मिळण्यासाठी निश्चित कालावधी असतो. सौरव गांगुलीचा तो कालावधी संपत आहे. डेडलाईन संपणार असल्याने सौरवच्या सुरक्षेचा विचार करून घाईघाईत बैठक आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी सौरवच्या सुरक्षेबाबत निर्णय घेतला. यासाठी राज्यातील सर्व पक्षांच्या चर्चा करण्यात आली. त्याधारे वाय ते झेड श्रेणीपर्यंत सुरक्षा निश्चित केली.
Former Indian cricket captain Sourav Ganguly's security cover to be upgraded to Z category by West Bengal Govt, say officials
— ANI (@ANI) May 17, 2023
(file pic) pic.twitter.com/CXwSdqflFp
सध्या सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्ली फ्रँचायझीचे आव्हान संपलेय. दिल्लीचे दोन सामने बाकी असल्यामुळे सौरव गांगुली कोलकात्याला परतला नाही. तो दिल्ली कॅपिटल्स संघासोबत आहे. आयपीएलनंतर गांगुली 21 मे रोजी कोलकात्यात पाऊल ठेवणार आहे. त्या दिवसापासून राज्य सरकारने सौरवसाठी दिलेली सुरक्षा लागू होईल.
Sourav Ganguly's security will be upgraded to the Z category by the West Bengal Government. pic.twitter.com/ruUIq71rWM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 17, 2023