शुभमन गिल म्हणतो....विराट कोहली वेनम तर ईशान किशन स्पायडरमॅन
Shubman Gill : विराट कोहलीला वेनमच्या तर ईशान किशन याला स्पायडरमॅनच्या भूमिकेत पाहायला आवडेल, असे शुभमन गिल याने सांगितले.
![शुभमन गिल म्हणतो....विराट कोहली वेनम तर ईशान किशन स्पायडरमॅन Shubman Gills Said He Want To See Ishan Kishan As Spiderman and Virat Kohli As Venom (Villain) शुभमन गिल म्हणतो....विराट कोहली वेनम तर ईशान किशन स्पायडरमॅन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/16/34fab07f45b00e46511a7c0b03dec34e1684206858459127_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shubman Gill : विराट कोहलीला वेनमच्या तर ईशान किशन याला स्पायडरमॅनच्या भूमिकेत पाहायला आवडेल, असे शुभमन गिल याने सांगितले. मुंबईत स्पायडरमॅन चित्रपाटचा ट्रेलर लाँच केला, त्यावेळी तो बोलत होता. शुभमन गिल याने आज अॅनिमेशन फिल्म 'स्पायडरमॅन : एक्रॉस द स्पायडर-वर्स' याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँट केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता. एक जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. देशभरातील 1800 स्क्रीनवर चित्रपट रिलीज होणार आहे. भारतात हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषेत चित्रपट रिलिज होणार आहे.
ट्रेलर लाँच करताना शुभमन गिल याने आपण स्पायरडमॅनचे लहानपणापासूनच स्पायडरमॅनचा फॅन असल्याचे सांगितले. 2002 मध्ये स्पायडरमॅन चित्रपट पहिल्यांदा पाहिल्याचे ट्रेलर लाँचवेळी गिलने सांगितले. इतकेच नाही तर... सात आठ वर्षाचा असताना स्पायडरमॅनला पाहून प्रेरित होईन भीतींवर चढण्याचा प्रयत्न करत होतो, असे गिलने सांगितले...
'स्पायडरमॅन : 'एक्रॉस द स्पायडर-वर्स' या अॅनिमेशन चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी चित्रपटाच्या डबिंगचा अनुभव यावेळी शुभमन गिल याने सांगितला. यावेळी शुभमन गिल याने चित्रपटातील हिंदी आणि पंजाबी डायलॉग ही बोलून दाखवले. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाचे डबिंग करताना एन्जॉय केले... मज्जा आल्याचे गिल याने ट्रेलर लाँच करताना सांगितले. डबिंगची आधीच तयारी करत असल्यामुळे फार काही अडचण आली नाही, असे गिल याने सांगितले. हर्तिक रोशन आवडता अभिनेता असल्याचे शुभमन गिल याने सांगितले.
विराट कोहली वेनम तर स्पायडरमॅन होईल इशान किशन -
शुभमन गिल याला विचारले की, जर क्रिकेटला पडद्यावर रिअल स्पायडरमॅन आणि वेनम (विलन) यांचा रोल करायचा असेल तर कोण परफेक्ट होईल. त्यावर गिल म्हणाला की, वेनमच्या रोलमध्ये विराट कोहलीला पाहायला आवडेल... तर स्पायडरमॅनच्या भूमिकेत ईशान किशन याला पाहायला आवडेल..
भविष्यात अभिनयामध्ये पदार्पण करणार का? यावर शुभमन गिल म्हणाला की, चित्रपटाचे जग त्याला खूप आवडते.. अभिनय करायला आवडेल. शुभमन गिल याने सांगितले की, रिअल लाईफ हिरो त्याचे वडिलच आहेत. लोकांसाठी माझे आयुष्य इन्सपायर होत असेल तर आवडेल. असेही गिल म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)