Shubhman Gill GT vs PBKS 2024: '...तेव्हा जिंकणं अजिबात सोपं नसतं'; शुभमन गिल थेट बोलला, पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Shubhman Gill GT vs PBKS 2024: पंजाबने गुजरातचा काल पराभव करत गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे.
Shubhman Gill GT vs PBKS 2024: रोमांचक झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) थरारक विजय मिळवताना गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) आव्हान 3 गड्यांनी परतावले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातने 20 षटकांत 4 बाद 199 धावा केल्यानंतर पंजाबने 19.5 षटकांत 7 बाद 200 धावा करत दमदार विजय मिळवला. शशांक सिंगने नाबाद अर्धशतक झळकावत सामन्याचे चित्र पालटत पंजाबला विजयी केले.
पंजाबविरुद्ध गुजरातच संघाचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. महत्वाच्या क्षणी झेल पकडण्यास गुजरातचे खेळाडू अपयशी ठरले. हा मुद्दा गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने सामन्यानंतर सांगितला. शुभमन गिल म्हणाला की, "मला वाटते की बरेच झेल सोडले आहेत, जेव्हा तुम्ही झेल सोडता तेव्हा जिंकणे अजिबात सोपे नसते. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही धावांमध्ये कमी पडलो, असं म्हणणार नाही.
गिल पुढे म्हणाला, नवीन चेंडूने गोलंदाजांनी चांगले काम केले. 200 धावा पुरेशा होत्या. आम्ही 15 षटकांपर्यंत सामन्यात ठीक होतो. झेल चुकवल्यामुळे आम्ही नेहमीच दडपणाखाली होतो. गेल्या सामन्यात त्याने (दर्शन नळकांडे) ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि सात धावांची गरज होती, आमच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. तुम्ही ज्यांना खेळताना पाहिले नाही ते लोक येतील आणि अशी इनिंग खेळतील, हेच आयपीएलचे सौंदर्य आहे, असं शुभमन गिलने सांगितले.
पाहा आयपीएलचे Latest Points Table-
3 सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स + 2.518 च्या उत्कृष्ट नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थाननेही आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा नेट + 1.249१ आहे. यानंतर 3 पैकी 2 जिंकणारा चेन्नई सुपरजायंट्स तिसऱ्या आणि लखनौ सुपर जायंट्स चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा नेट रन रेट +0.976 आणि लखनौचा +0.483 आहे. त्यानंतर पंजाब किंग्ज 4 गुणांसह पाचव्या तर गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद 2 गुणांसह सातव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आठव्या आणि दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. हैदराबादने 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 1 पराभव झाला आहे. बंगळुरू आणि दिल्ली 4-4 सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना फक्त 1-1 जिंकता आले आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि ते टेबलमध्ये तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहेत.
संबंधित बातम्या:
गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी, सामनावीर पुरस्कारही मिळवला; पण शशांक सिंग हे काय बोलून गेला?
11 चेंडूत अर्धशतक, युवराज सिंगचा 16 वर्षांचा मोडलाय विक्रम; कोण आहे आशुतोष शर्मा?