एक्स्प्लोर

RR vs RCB Playing 11 : विल जॅक्सला RCB संधी देणार? राजस्थानच्या संघातही बदल निश्चित, पाहा संभाव्य प्लेईंग 11 

IPL RR vs RCB : जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी आठव्या स्थानावर विराजमान आहे.

IPL RR vs RCB Playing 11 : खराब फॉर्मात असणारा आरसीबी आणि तुफान फॉर्मात असलेल्या राजस्थान संघामध्ये (RR vs RCB) आज रॉयल लढत होणार आहे. आज जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी आठव्या स्थानावर विराजमान आहे. राजस्थानच्या आघाडीच्या फळीला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संजू सॅमसन, यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांना अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. दुसरीकडे आरसीबीकडून विराट कोहली भन्नाट फॉर्मात आहे, पण कर्णधार फाफ डु प्लेसिसी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन अन् रजत पाटीदार यांना अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण शानदार कामगिरी करणार, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. राजस्थान आणि आरसीबीच्या संघात आज बदल होण्याची शक्यता आहे. 

आरसीबी आज हुकमी एक्का मैदानात उतरवणार ?

आरसीबीकडून स्टार फलंदाज विराट कोहली यानं दोन अर्धशतकासह 203 धावा केल्या आहेत. विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप आहे.. विराट खोऱ्याने धावा काढतोय, पण दुसऱ्या बाजूने विराटला हवी तशी साथ मिळत नाही. रजत पाटीदार यानं लखनौविरोधात 29 धावांची खेळी केली, पण त्याच्याकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. ग्लेन मॅक्सेवल, कॅमरुन ग्रीन आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांना अद्याप सूर गवसलेला नाही. आज आरसीबी प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे. कॅमरुन ग्रीन याच्या जागी आरसीबी विल जॅक्स याला स्थान देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय फिरकी गोलंदाज मयंक डागर याच्या जाही कर्ण शर्मा यालाही स्थान मिळू शकतं. 

राजस्थानच्या ताफ्यातही बदलाची शक्यता - 

विस्फोटक सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याला अद्याप सूर गवसलेला नाही. तीन डावात त्याला फक्त 39 धावाच करता आल्या. जोस बटलरही फॉर्मात नाही, तीन डावात त्यानं 35 धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटही चिंतेचा विषय आहे. संजू सॅमसन यानं 109 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून रियान पराग सध्या जोरदार फॉर्मात आहे. रियान पराग यानं 181 धावा जमवल्या आहेत. राजस्थानची गोलंदाजी मजबूत आहे. त्यात आता संदीप शर्माची भर पडणार आहे. मागील सामन्यात दुखापतीमुळे संदीप शर्मा प्लेईंग 11 चा भाग नव्हता, आज त्याला खेळवण्याची शक्यता आहे. ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांच्या भेदक माऱ्याच्या जोडीला संदीप शर्माची साथ मिळेल. आवेश खानच्या जागी संदीप शर्माला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. 

आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स/कॅमरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), कर्ण शर्मा, रीस टॉपले, मोहम्मद सिराज, यश दयाल। 

इम्पॅक्ट प्लेअर- सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, स्वप्निल सिंह

राजस्थान रॉयल्स प्लेईंग 11 :

यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान/संदीप शर्मा, नंद्रे बर्गर, युजवेंद्र चहल 

इम्पॅक्ट प्लेअर - रोवमन पॉवेल, तनुश कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आवेश खान/संदीप शर्मा

आणखी वाचा :

IPL 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाला घाबरायचो, चेन्नईच्या प्रशिक्षकच्या वक्तव्यानं खळबळ

IPL Points Table : चेन्नईच्या पराभवाचा फटका गुजरात-पंजाबला, गुणतालिकेत झाला मोठा बदल

IPL 2024: शाहरुखला विचारा मला रिटेन का नाही केलं? शुभमन गिल असं का म्हणाला..

IPL 2024 : ट्रोल करणाऱ्यांना प्रितीचं सडेतोड उत्तर, शशांकसाठी खास पोस्ट, लिलावातील चुकीबद्दलही दिलं स्पष्टीकरण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget